वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेली पंधरा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी हास्य मालिका म्हणजेच’ तारक मेहता का उल्टा चष्मा. पण, आता ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अगदी कोणत्याही वयोगटाला ही मालिका आपलीशी वाटते. परंतु गेल्या काही वर्षापासून मालिकेतील मुख्य पात्र दयाबेन दिसत नाही. याचे कारण दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी २०१७ पासून मॅटरनिटी लिव्ह वरती गेली ती परत आलीच नाही.
प्रेक्षकांनी या पात्राला खूप पसंती दिली होती, परंतु निर्मात्यांनी प्रत्येक वेळेस प्रेक्षकांना दयाबेन लवकरच शोमध्ये परत येणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण ती प्रत्येक वेळेस अफवाच ठरली .आता प्रेक्षकही निर्मात्यांच्या या फसवेगिरीला कंटाळले असून चक्क मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जातेय.
सोशल मीडिया वरती ‘बॉयकॉट टी. एम .के. ओ. सी.’ सध्या ट्रेंड होत आहे. परंतु मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी नुकतच असं सांगितले की दयाबेन परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु दिशा वाकानी की दुसरी कोणी हे लवकरच कळेल. त्यासाठी ऑडिशन पण सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र दयाबेनच्या वापसीसाठी आणखी थोडी वाट बघावी लागणार हे मात्र नक्की!