सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चार वर्षांची प्रतीक्षा फळाला…. १९ तरुणांना शासन सेवेत अशी मिळाली नियुक्ती

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2023 | 5:03 pm
in संमिश्र वार्ता
0
Mantralay


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
त्या १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु कोविडच्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे करिअर संकटात सापडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे या १९ तरुणांच्या करिअरला पुन्हा नवे वळण मिळाले व या तरुणांना अखेर शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ३१३ कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये राज्यभरातून सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. सन २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या व २०२० मध्ये निकाल जाहीर करण्यात आला.

निकालात उत्तीर्ण उमेदवारांनी काही कारणामुळे नियुक्ती स्वीकारली नाही किंवा विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. अशा १९ उमेदवारांना कृषी सेवक पदी नियुक्तीची संधी मिळाली. परंतु याच दरम्यान कोविडची साथ आल्यामुळे जग ठप्प झाले. सन २०२० ते २१ या कालावधीत कोविड साथीमुळे सदर कृषी सेवक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम सुद्धा रखडले.

निकालाच्या दिनांकापासून एक वर्षात नियुक्ती देणे बंधनकारक होते. मात्र कोविड महामारीमुळे नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास उशीर झाल्याने निवड सूची वैधता कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे या १९ तरुणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यावर न्यायाधिकरणाने संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश २०२१ च्या अखेरीला दिले. त्यानुसार या १९ तरुणांनी नियुक्तीच्या निर्णयासाठी शासनाचे दार ठोठावले.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी १५ जुलै २०२३ रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर ताबडतोब या मुलांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर या तरुणांना कृषी सेवक पदावर नियुक्ती देण्यात आली. याबद्दल या तरुणांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारतर्फे नाशिक जिल्हयात या कालावधीत भारत संकल्प यात्रा.. ही आहे वैशिष्टये… जिल्हाधिकारी यांनी दिल्या या सुचना

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उध्दव ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन…बघा हा व्हिडिओ

Next Post
Untitled 77

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उध्दव ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन…बघा हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011