रविवार, जुलै 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय पोस्टाने घेतला हा मोठा निर्णय; देशातील तब्बल ८ कोटी व्यापाऱ्यांना होणार फायदा

by Gautam Sancheti
मे 10, 2023 | 2:54 pm
in राष्ट्रीय
0
CLP 32051WHO e1683710614731

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया पोस्ट विभागाने अखिल भारतीय व्यापारी महासंघ (सीएआयटी) आणि ट्रिप्टा टेक्नोलॉजीज यांच्याशी सामंजस्य करार केला. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. या करारान्वये ‘भारत ईमार्ट’ या पोर्टलचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या कार्यस्थळावरुन मालाची खेप उचलली जाण्याची सोय झाली असून देशभरात जेथे हा माल पोहोचणे अपेक्षित आहे तेथे पोहोचण्याची सुनिश्चिती झाली आहे. या सुविधेचा लाभ सीएआयटीशी जोडल्या गेलेल्या सुमारे आठ कोटी व्यापाऱ्यांना होईल असा अंदाज आहे.

इंडिया पोस्टने नुकतेच माल पाठविणारे आणि घेणारे यांच्या ठिकाणी अनुक्रमे पार्सलचे पिकअप आणि वितरण करण्याची सेवा पुरविण्यासाठी सरकारी ई-बाजार (जीईएम), भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाची प्रादेशिक केंद्रे यांच्याशी अशाच प्रकारचे करार केले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे विकसित होणाऱ्या डिजिटल वाणिज्य मंचासाठीच्या ओपन नेटवर्कमध्ये इंडिया पोस्ट हे लॉजिस्टिक सेवा पुरवठादार म्हणून लवकरच सहभागी होणार आहे.

आजच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणाले की टपाल विभागाने काळाबरोबर आणि जनतेच्या मागणीनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. तंत्रज्ञानाचा समावेश तसेच नव्या सेवांची सुरुवात यामुळे इंडिया पोस्ट आता आधुनिक आणि बहुविध प्रकारच्या सेवांचा पुरवठादार विभाग झाला आहे. आज या विभागाद्वारे बँकिंग, विमा या सुविधांसोबतच सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, या विभागाने कोविड-19 च्या काळात तंत्रज्ञानाची मदत घेऊन डिजिटल आर्थिक व्यवहार तसेच ऑनलाईन सेवा वितरण सुरु करून या संकटाचे संधीमध्ये रुपांतर केले.

India Post 8 Crore Traders Benefit Parcel Courier

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा कसा आहे? शो बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Next Post

हे पहा, WhatsApp ठेवतेय तुमच्यावर बारीक लक्ष; केंद्र सरकारनेही घेतली गंभीर दखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
WhatsApp Logo

हे पहा, WhatsApp ठेवतेय तुमच्यावर बारीक लक्ष; केंद्र सरकारनेही घेतली गंभीर दखल

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

जुलै 19, 2025
पशुसंवर्धन विभाग 1001x1024 1

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती…४५८ कोटीची तरतूद

जुलै 19, 2025
Untitled 42

नाशिक जिल्हा जंपरोप स्पर्धा उत्साहात संपन्न…राज्य फेडरेशन चषक स्पर्धेचेही नाशिकमध्ये आयोजन

जुलै 19, 2025
IMG 20250719 WA0393 1

१५ लाखांचा लुटीचा बनाव उघड; शेअर मार्केट आणि अँटीक नोटांच्या आमिषाला बळी पडून आरोपीने रचला होता बनाव

जुलै 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावी, अतिरेक टाळावा, जाणून घ्या, रविवार, २० जुलैचे राशिभविष्य

जुलै 19, 2025
crime 88

भरदिवसा झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी दहा लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जुलै 19, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011