नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या देशात मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) प्रकल्प हा मंजुरी मिळालेला देशातील एकमेव अति-वेगवान रेल्वे प्रकल्प आहे. जो जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने राबवण्यात येत आहे. तसेच , खालील सात (७) अतिवेगवान रेल्वे कॉरिडॉरसाठी सर्वेक्षण आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या ७ मार्गांमध्ये
(i) दिल्ली – वाराणसी
(ii)दिल्ली-अहमदाबाद
(iii)मुंबई-नागपूर
(iv)मुंबई -हैदराबाद
(v)चेन्नई – बंगळुरु – म्हैसूर
(vi)दिल्ली – चंदीगढ – अमृतसर
(vii)वाराणसी – हावडा
या मार्गांचा समावेश आहे.
तसेच , सरकारने खालील दोन सेमी हाय स्पीड रेल प्रकल्पांसाठी गुंतवणूक-पूर्व कामांना “तत्त्वतः” मंजुरी दिली आहे:-
(i)स्टँडर्ड गेज वर तिरुवनंतपुरम ते कासरगोड सेमी हाय स्पीड रेल (सिल्व्हरलाइन) प्रकल्प; आणि
(ii)ब्रॉडगेज मार्गावर पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल प्रकल्प.
दोन्ही सेमी हाय स्पीड रेल प्रकल्प अनुक्रमे केरळ आणि महाराष्ट्र राज्य सरकारांच्या केरळ रेल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MRIDC) या संयुक्त उपक्रम कंपनीद्वारे कार्यान्वित केले जाणार आहेत. रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
India Highspeed Railway 7 Routes Parliament Union Government