नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील 5G सेवेबाबत सर्वात मोठी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांची प्रतिक्षा संपणार आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या दूरसंचार ऑपरेटर त्यांच्या 5G सेवा भारतात आणण्यासाठी तयार आहेत. आता पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 5G सेवा सुरू करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये नवीन पिढीतील इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत.
नॅशनल ब्रॉडबँड मिशनने एक ट्विट शेअर केले आहे, जे आता हटविण्यात आले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस, आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शनात 5G सेवा सादर करतील.
इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) च्या अधिकृत वेबसाइटवर असे सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग असतील. दूरसंचार विभाग, दळणवळण मंत्रालय आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) हे सर्व या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सेवांचे अधिकृत प्रक्षेपण १ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे उघड झाले आहे.
जिओ सेवा
रिलायन्स जिओने पुष्टी केली आहे की २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सणापासून भारतात 5G सेवा सुरू होईल. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) २०२२ मध्ये सांगितले की सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला 5G चा लाभ मिळेल. कंपनीने पुढील वर्षापर्यंत सर्व Jio वापरकर्त्यांना 5G सेवा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एअरटेल सेवा
एअरटेलने पुष्टी केली आहे की त्यांची 5G सेवा या महिन्याच्या अखेरीपासून सुरू केली जाईल. एअरटेलची 5G सेवा डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की यानंतर देशभरात रोलआउट सुरू होईल आणि पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा मार्च २०२४ पर्यंत सर्व वापरकर्त्यांना याचा लाभ मिळेल.
@exploreIMC @ConnectCOAI @DoT_India @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/GL5n1qmiTu
— India Mobile Congress (@exploreIMC) September 23, 2022
India 5G Launching Date Fix PM Modi
India Mobile Congress 1 October 2022
Reliance Jio Bharti Airtel