India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इगतपुरी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल सव्वा कोटीचा गुटखा जप्त

India Darpan by India Darpan
May 27, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)  – महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेऊन इगतपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  इगतपुरी जवळ ग्रँड परिवार हॉटेल समोर १ कोटी २८ लाख किमतीच्या १७८ गोण्या गुटखा जप्त केला आहे. यासह लाखो रुपये किमतीची २ वाहने सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत.

याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही धडक कारवाई इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी स्वतः आपल्या पोलीस पथकामार्फत केली. वाहनचालक सलमान अमीन खान (वय ३२), इरफान अमीन खान (वय ३१ रा. हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे.

इगतपुरी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोन मोठे वाहन पकडून झाडाझडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. SHK Premium आणि 4K (STAR) ह्या गुटख्याच्या एकूण १७८ गोण्या जप्त करण्यात आल्या. १ कोटी २८ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेचे विविध कलम आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, ढोकरे, सचिन देसले, मुकेश महिरे, खराटे, संवत्सर, अहिरे, रुद्रे, पोटींदे, बागुल आदींनी ही मोलाची कामगिरी केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या कामगिरीबद्धल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Igatpuri Police Raid Gutkha Seized


Previous Post

शुभमन गिलने मुंबईला आधी प्लेऑफमध्ये पोहचवले, आता बाहेर पाठवले…. मुंबई इंडियन्स जबरदस्त ट्रोल

Next Post

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद…. सुषमा अंधारेंनी आडनावांचा अख्खा इतिहासच सांगितला…

Next Post

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद.... सुषमा अंधारेंनी आडनावांचा अख्खा इतिहासच सांगितला...

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group