सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुठलाही क्लास न लावता ही युवती बनली IAS अधिकारी; असा आहे तिच्या यशाचा फॉर्म्युला

by Gautam Sancheti
जुलै 25, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
sarjana yadav ias

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे अनेक युवक-युवतींचे स्वप्न असते. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराला यशस्वी IAS किंवा IPS अधिकाऱ्यापेक्षा कोण चांगला मार्गदर्शक असू शकतो. एका IAS अधिकाऱ्याची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत, विशेष म्हणजे तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वयंअभ्यासातून परीक्षा उत्तीर्ण केली.

ही कहाणी आहे आयएएस अधिकारी सर्जना यादवची, जिने कोणत्याही कोचिंग UPSC परीक्षेची तयारी केली. तसेच सर्जना यादव 2019 मध्ये नागरी सेवा परीक्षेत भारतभरात 126 क्रमांक मिळवून IAS अधिकारी बनली. सर्जना यादवने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले होते.
आजच्या युगात बहुतेक UPSC तयारीसाठी इच्छुक कोचिंग क्लासेसवर अवलंबून असतात, या परीक्षेबद्दल सर्जना यादव यांचे मत वेगळे होते.

एका मुलाखतीत सर्जना म्हणाली की, उमेदवाराला कोचिंग घ्यायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. जर असे वाटत असेल की तुमच्याकडे पुरेसे अभ्यास साहित्य आहे आणि UPSC साठीची तयारी करण्याची अधिक चांगली जिद्द आहे, तर तुम्ही स्वत:च्या अभ्यासावर अवलंबून राहून यश मिळवू शकता. तसेच सर्जना यादव यांच्या मते, तुम्ही शिस्तबद्ध आणि तुमच्या अभ्यासाबाबत प्रामाणिक असाल तर स्वत:चा अभ्यास अधिक चांगला होतो.

सर्जना यादवने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर सर्जना यादव ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करू लागल्या. पूर्णवेळ नोकरीसोबतच सर्जना यूपीएससी परीक्षेची तयारी करत असे. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही तिने हार न मानता पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी ती यशस्वी झाली.

या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या क्षमतेनुसार नियोजन बनवावे, असे सर्जना सांगते. तयारी सुरू करण्याबरोबरच अभ्यासाची वेळही ठरवली पाहिजे. विषय नीट वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. एकदा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, शक्य तितकी उजळणी करा आणि शक्य तितक्या उत्तर लिहिण्याचा सराव करा. अपयशाला घाबरण्याची गरज नाही, मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल.

देशात दरवर्षी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिविल सर्व्हिस परीक्षेत लाखो उमेदवार आपलं नशीब आजमावतात. पण यश जवळपास १ टक्के उमेदवारांना मिळते. यात बहुतांश असे विद्यार्थी असतात की ज्यांनी कोचिंग क्लासेसवर लाखो रुपये खर्च केलेले असतात. तरीही यश काही प्राप्त होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे या परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य नियोजनाच्या माहितीचा अभाव होय. पण जर तुम्ही वेळापत्रकाच्या बाबतीत काटेकोर असाल आणि अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल तर स्वत: अभ्यास करणं खूप चांगला पर्याय ठरतो, असं सर्जना यादव म्हणाली.

सर्जना सांगते की या परीक्षेची तयारी करणारे बहुतेक उमेदवार एकतर नोकरी करत आहेत किंवा नुकतेच पदवीधर झाले आहेत. त्यामुळे त्यांना नियमीतपणे वृत्तपत्र खूप महत्वाचे आहे. यासोबतच तुम्ही ऑनलाइन वेबसाइटचीही मदत घेऊ शकता, जिथे चालू घडामोडींची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास केलात तर तुमच्या यशाची शक्यता खूप वाढते, असे तिने सांगितले.

IAS Officer Sarjana Yadav Success Story No Coaching Class

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘माझी पत्नी हो दरमहा २५ लाख देतो’ व्यावसायिकाने या अभिनेत्रीला दिली होती ऑफर

Next Post

सर्पदंश झाल्यास हे तत्काळ करा, हे मात्र करु नका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sneck

सर्पदंश झाल्यास हे तत्काळ करा, हे मात्र करु नका

ताज्या बातम्या

Show e1754275627463

नाशिक येथे या तारखेला महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा…नाट्यरसिकांना दोन दिवस मेजवानी

ऑगस्ट 4, 2025
image0042EZO

या तीन नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरु….रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा

ऑगस्ट 4, 2025
cbi

मुंबईत सीमाशुल्क अधीक्षकाला १० लाख २० हजाराची लाच घेताना सीबीआयने केली अटक

ऑगस्ट 4, 2025
Untitled 3

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

ऑगस्ट 4, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विनाकारण वादात पडू नये, जाणून घ्या, सोमवार, ४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011