इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री हैदराबादला पोहोचले. येथे त्यांनी हकिमपेट येथील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमी (NISA) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 54 व्या स्थापना दिवस परेडला हजेरी लावली. दरम्यान, भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी हैदराबादमध्ये ठिकठिकाणी ‘वॉशिंग पावडर निरमा’चे पोस्टर लावून भाजप आणि अमित शहांवर निशाणा साधला आहे. या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा आहे.
या पोस्टरमध्ये भाजपच्या त्या आठ नेत्यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे, जे एकेकाळी इतर पक्षात होते. पोस्टरवर वेलकम टू अमित शाह असेही लिहिले आहे. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षात असताना भाजपने ज्या लोकांवर आरोप केले होते, ते त्यांच्या पक्षात सामील होताच स्वच्छ आणि निष्कलंक होतात.
ईडी, सीबीआय आणि इतर एजन्सींच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचे काम भाजप करते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि बीआरएस आमदार के. कविता यांचे नाव दिल्लीतील दारू घोटाळ्यात आले आहे. शनिवारीच तपास यंत्रणेने कविता यांची बराच वेळ चौकशी केली. त्यावरुनच बीआरस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
In addition to providing unbreachable security to institutions of national importance, the @CISFHQrs is today well-known for conducting rescue operations.
Delighted to be among the brave CISF personnel at their 54th Raising Day parade in Hyderabad. pic.twitter.com/hRQfXMrsBq
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) March 12, 2023
दिल्ली-एनसीआरच्या बाहेर CISF स्थापना दिन साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरात विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सरकारच्या सूचनेनंतर दिल्लीबाहेर हे उत्सव आयोजित केले जात आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादला पोहोचल्यानंतर अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांशी राज्यातील ताज्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी हैदराबादमध्ये सीआयएसएफ फाउंडेशन डे परेडच्या नंतर पक्षाच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली. सीआयएसएफच्या स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर शाह सकाळी 11.30 च्या सुमारास केरळला रवाना झाले. तेथे ते त्रिशूरमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत.
Hyderabad Amit Shah Welcome Poster Washing Powder Nirma