साप्ताहिक राशिभविष्य – ५ ते १२ सप्टेंबर
मेष – नवनवीन व्यावसायिक संधी मिळतील. अतिविश्वास टाळा. आर्थिक टार्गेट पूर्ण होईल. कार्यास प्रसिद्धी मिळेल….
वृषभ – विदेशी व्यापार संधी. मिळकतीच्या व्यवहारात लाभ. नातेसंबंधातील कटुता मिटेल. साथ-संगत सांभाळा…..
मिथुन – अनामित हुरहूर लागेल. कायदेशीर बाबींचे प्रश्न मिटतील. मेहनतीचे चीज होईल. मध्यस्ती यशस्वी होईल…..
कर्क – मित्र परिवाराची योग्य ती साथ लाभेल. सार्वजनिक जीवनात चांगले अनुभव येतील. विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता मिळेल. परिस्थितीजन्य अनुभवाचा त्रागा नको…..
सिंह – मोठे आर्थिक निर्णय सांभाळून घ्या. नोकरदारांच्या बदलीची शक्यता. शुभकार्य ठरेल. नूतन वास्तू खरेदी शक्यता……
कन्या – भावनिक ओढाताण सांभाळा. व्यावसायिक स्पर्धा खिलाडूवृत्तीने घ्या. “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना” हे लक्षात असू द्या…..
तूळ – जुनाट व्याधी सांभाळा. प्रवास संभवतो. नोकरीत बढती. वास्तुविषयक व्यवहार सांभाळून करा. पगार वाढ होईल……
वृश्चिक – सर्वंकष फलदायी सप्ताह. भागीदार व्यवहार सांभाळा. व्यवसायातील अंदाज यशस्वी होतील. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा…..
धनु – हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. अनपेक्षित सुवार्ता मिळेल. नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतील. कौटुंबिक सदस्यांची शैक्षणिक प्रगती होईल…..
मकर – मनाविरुद्ध घटना खिलाडूवृत्तीने स्वीकारा. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जीसाठी अधिक परिश्रम करावे लागतील. प्राप्त परिस्थिती शांतपणे स्वीकारा…..
कुंभ – कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. वाहन सांभाळून चालवा. आर्थिक अडचणींवर मात कराल. नवीन परिचय सांभाळून करा…..
मीन – अनामिक चिंता बाळगू नये. सप्ताहाच्या शेवटी शुभवार्ता. नवीन व्यवसायात जडण-घडण होईल. कलाकारांना दिलासा मिळेल……….
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.