विशेष प्रतिनिधी, पुणे
गेल्यावर्षी वाहन बाजारात काहीसे मंदीचे वातावरण होते, त्यानंतर मात्र यंदा वाहन बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याच वेळी काही दुचाकी वाहनांच्या किमतीत वाढ झाल्याने नवीन ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. होंडा टू-व्हीलर्स इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपल्या वाहनांच्या दरवाढीची घोषणा केली आहे.
होंडा कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील सर्वाधिक विक्री करणार्या स्कूटर होंडा अॅक्टिव्हाला परवडणारी प्रवासी मोटारसायकल शाईन आणि एसपी १२५ च्या किंमतीही वाढल्या आहेत. तथापि, किंमत वाढवण्याव्यतिरिक्त या वाहनांमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
कंपनीच्या प्रसिद्ध स्कूटर होंडा अॅक्टिवा ६ जी च्या एंट्री लेव्हल व्हेरिएंट एसटीडीची प्रारंभिक किंमत आता ७०,७१६ रुपयांवर गेली आहे, यापूर्वी ६९,४७९ रुपये होती. अॅक्टिव्हाच्या डीएलएक्स व्हेरिएंटची किंमत ७२,४६१ रुपयांवर गेली आहे, आधी ७१,२२५ रुपये होती. याशिवाय स्टँडर्ड लिमिटेड एडिशनची किंमत आधीच्या ७०,९७९ रुपयांवरून ७२,२१६ रुपयांवर गेली आहे. लिमिटेड एडिशन डीएलएक्स व्हेरिएंटसाठी ग्राहकांना, ७३, ६११रुपये खर्च करावे लागतील, आधी ७२,७२५ रुपये होती. त्याचप्रमाणे या कंपनीने अॅक्टिवा १२५ च्या किंमतीही वाढवल्या आहेत. त्याच्या एंट्री लेव्हल स्टील ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत ७५,०८४ रुपयांवर गेली आहे, आधी ७४,१२० रुपये होती.
अॅलॉय ड्रम व्हेरिएंटसाठी तुम्हाला आता ७८,७५२ रुपये द्यावे लागतील, आधी ७७,७८८ रुपये होते. त्याच्या टॉप अॅलोय डिस्क व्हेरिएंटची किंमत आधीच्या ८१,२९३ रुपयांवरून ८२,२५६ रुपयांवर गेली आहे.
स्कूटरबरोबरच होंडाने शाईन आणि एसपी १२५ या दोन प्रवासी बाइकच्या किंमतीतही वाढ केली आहे. या दोन्ही बाईकच्या किंमतीत १,२३६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. होंडा शाईनच्या एंट्री लेव्हल ड्रम प्रकारची किंमत पूर्वीच्या ७३,००४ रुपयांवरून ७४,२४० रुपये आहे. डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत ७९०३६ वर गेली आहे, आधी ७७,८०० रुपये होती.
एसपी १२५ च्या ड्रम व्हेरिएंटची किंमत आधीच्या ७७,२१७ रुपयांवरून ७८,४५३ रुपयांवर गेली आहे. त्याशिवाय डिस्क व्हेरिएंटची किंमत ८२,७४८ रुपयांवर गेली आहे, आधी ८१,५१२ रुपये होती. या दोन्ही बाईक्समध्ये कंपनीने १२४ सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन वापरलेले आहे. ते १०.७४ पीएसची शक्ती आणि ११एनएमची टॉर्क जनरेट करत असून हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.