नवी दिल्ली – जागतिक अॅथलेटीक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “आपल्या सर्वोत्तम क्रीडापटूंपैकी एक असलेल्या क्रीडापटूची सरस कामगिरी! #WorldChampionships मध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकल्याबद्दल @Neeraj_chopra1 चे अभिनंदन. भारतीय क्रीडा विश्वासाठी हा खास क्षण आहे. नीरजला त्याच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा.”
https://twitter.com/narendramodi/status/1551051269397446657?s=20&t=7PCKejoMgLuGub3ir2R01A