अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या पश्चिम पट्ट्याला पावसाने झोडपून काढल्याने पाळे खुर्द-असोली दरम्यानचा खडीकरण रस्ता व फरशी पूल व वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी दुप्पट वाहतूक खर्च मोजवा आहे. तर हिंगवे शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचा बाजूचा भराव वाहून गेल्यान बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेले असून सुमारे पाचशे एकर शेत जमिनीला शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. एकाच वेळी बंधारा आणि रस्ता खचल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दोन्ही कामांना प्राधान्य देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.