India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

डोळ्यादेखत दुकाने आणि घरे वाहून गेली; बघा धक्कादायक व्हिडिओ

India Darpan by India Darpan
August 14, 2022
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिमाचल प्रदेश येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या. आता हिमाचल येथील असाच एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओही आता समोर येत आहे. हिमाचलच्या कुल्लू येथे ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानात एक संपूर्ण दुकान क्षणार्धात वाहून गेल्याचं संबधित व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

अमरनाथ सारख्या भागांतच होते ढगफुटी, एखाद्या छोट्याशा भागात कमी वेळात खूप जास्त पाऊस होण्याला ढगफुटी म्हणतात. यात ढग फुटण्यासारखे काहीच नसते. पण पाऊस एवढा मुसळधार पडतो की, पाण्याने भरलेली पॉलिथीनची बॅग आकाशातून जमिनीवर पडल्याचा भास होतो. त्यामुळे या घटनेला मराठीत ढगफुटी व इंग्रजीत cloudburst म्हटले जाते.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात अचानक एका तासात किंवा त्याहून कमी वेळेत 100 एमएम किंवा त्याहून अधिक पाऊस झाला तर त्याला ढगफुटी म्हटले जाते. अनेकदा अवघ्या काही मिनिटांतच मुसळधार पाऊस होतो. येथे ‘अचानक’ या शब्दाला मोठे महत्व आहे. सामान्यतः ढगफुटी केव्हा होईल याचा अचूक अंदाज सांगणे फार अवघड असते.

सुमारे 1 मिलिमीटर पाऊस होणे म्हणजे 1 मीटर लांब व 1 मीटर रुंद म्हणजे 1 चौरस मीटर क्षेत्रात 1 लिटर पाऊस होणे. आता या अर्थाने ढगफुटीकडे पाहिले तर जेव्हाही 1 मीटर लांब व 1 मीटर रुंद क्षेत्रात 100 लिटर किंवा त्याहून अधिक पाऊस झाला, तेही एक तास किंवा त्याहून कमी वेळेत, तर त्या भागात ढगफुटी झाली होते. जेव्हा 1 चौरस किलोमीटर क्षेत्रात एका तासाहून कमी वेळात 10 कोटी लिटर पाणी पडले, त्या भागात ढगफुटी झाल्याचे मानले जाते.

समजा अमरनाथमध्ये ढगफुटी झाली असेल तर त्या भागातील 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात एका तासाहून कमी वेळात 200 ते 300 कोटी लिटरहून अधिक पाऊस पडला असेल. पण जेव्हाही 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात एका तासाहून कमी वेळेत 100 mm किंवा त्याहून अधिक पाऊस झाला तर त्याला ढगफुटी म्हटले जाते. तीव्रता सोडली तरी या दोन्ही घटनांतील सर्वात मोठे अंतर म्हणजे मुसळधार पावसाचा अंदाज लावता येतो. पण ढगफुटीचा नाही.

ढगफुटीनंतर अचानक व अतिमुसळधार पाऊस होतो. याशिवाय सामान्यतः डोंगराळ भागातच ढगफुटी होते. भारतात अशा घटना नेहमीच हिमालयाच्या डोंगररांगात घडतात. ढग हे मुख्यत्वे सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या ओलसर वाऱ्यांसोबत वाहून जमिनीच्या दिशेने येतात. मान्सूनच्या वाऱ्याचे ढग हिमालयाला धडकून त्यांची एकाच ठिकाणी गर्दी होते. या प्रकरणी एक वेळ अशी येते की, एखाद्या भागावर हे ढग पाण्याने भरलेल्या पिशवीसारखे अचानक फुटतात. म्हणजेच, एका छोट्या क्षेत्रात खूप वेगाने पाऊस पडतो, यालाच ढगफुटी म्हणतात.

बद्रीनाथ हिमालयात 3300 तर केदारनाथ 3583 मीटर उंचीवर आहे. मागील प्रश्नाच्या उत्तरात अगोदरच सांगितल्याप्रमाणे, हिमालयाला आदळल्यानंतर मान्सूनचे ढग हळूहळू मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि ढगफुटीचे वातावरण तयार होते. त्यामुळेच अशा हिमालयीन भागात अनेकदा ढगफुटी होते. मात्र हिमालय असो किंवा मैदानी भाग सर्वत्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अनेकदा ढगफुटी होते. तापमानाच्या वाढीच्या दरानुसार हिमालयीन भागात ढगफुटीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

ढगफुटीच्या वाढत्या घटनांमुळे अचानक पूर येणे, दरडी कोसळणे, मातीची धूप होणे आणि जमीन खचण्याच्या घटनांत मोठी वाढ होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानतर अगदी दचकून जाऊ शकता. तर ही संपूर्ण घटना हिमाचल प्रदेश येथील कुल्लूच्या आनी ब्लॉक येथील आहे. ‘कुल्लूच्या आनी ब्लॉकमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला आणि दुकानाचा ढाचाच वाहून गेला. एका बस स्टँडजवळील हे दृश्य आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका वाहत्या नाल्यासोबत रस्त्याचा एक मोठा भाग अगदी विचित्रपणे कोसळताना दिसत आहे. एक संपूर्ण दुकान देखील यावेळी थेट खाली दरीत कोसळत असल्याचं दिसत आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ सर्वाधिक व्हायर होत आहे. 11 ऑगस्ट रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यूजर्स व्हिडिओला सतत रि-ट्विट करत कमेंट्सही करत आहेत.

हिमाचल प्रदेश येथील चंबामध्ये ढगफुटी आणि भरमौर भागात संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी मोठं नुकसान होत असून कुल्लू जिल्ह्यात भूस्खलनात दोन महिला ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याची घटना देखील समोर आली आहे. तसंच अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे अनेक दुकाने आणि वाहने वाहून गेली आणि महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Himachal Pradesh Heavy Rainfall Flood Video


Previous Post

NPS आणि अटल पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल; कोट्यवधी नागरिकांना बसणार फटका

Next Post

लालू कुटुंबियांवर सीबीआय आणि ईडीची पुन्हा कारवाई होणार?

Next Post

लालू कुटुंबियांवर सीबीआय आणि ईडीची पुन्हा कारवाई होणार?

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group