मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतु काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकित मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्रशिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत, तसंच २०२१-२२ पासूनचे मानधन प्रलंबित न ठेवता दिवाळीपूर्वीच करण्याबाबत आणि हे मानधन देण्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालकांनी दर तीन दिवसांनी आढावा घेण्याबाबत आज सक्त सूचना दिल्या. pic.twitter.com/M29hnYuXSh
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 11, 2022
Higher Education Professor Payment Decision