India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उरणच्या वीजनिर्मिती केंद्रातील बॉयलर स्फोटातील तिसऱ्या कामगाराचाही दुर्दैवी मृत्यू

India Darpan by India Darpan
October 11, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

उरण – उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात ९ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या बॉयलरच्या झालेल्या भीषण स्फोटात सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगार ८० ते ८५ टक्के भाजले होते. त्यातील विवेक धुमाळे याचा हायप्रेशरच्या वाफेच्या होरपळून जागीच मृत्य झाला. बोकडविरा येथील दुसरा कामगार विष्णू पाटील हा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मरण पावला.तर डोंगरी येथील रहिवासी असलेला तिसरा कामगार कुंदन पाटील अत्यवस्थ असल्याने तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना आज ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२.३० वाजता नवीमुंबई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतांना त्याची प्राणज्योत मालवली.

या वायू विद्युत केंद्राच्या दुर्घटनेतील एका सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगारांना त्यांचा काहीही दोष नसतांना जीवाला मुकावे लागले आहे.सोमवारी १० ऑक्टोबरच्या रात्री कामगार विष्णू पाटील यांचा मृतदेह वायू विद्युत निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वाजवळ आणण्यात आला होता. व्यस्थापणाने मूत कामगारांच्या वारसांच्या भविष्यासाठी त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळावा या मागणीसाठी प्रयत्न केले. मात्र निर्धास्त असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मृत कामगारांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्या ऐवजी सरकारी नियमांचे पाढे वाचण्याशिवाय विशेष काही मदत देण्यावर भर दिलाच नाही.एकंदरीत प्रकल्पातील दुर्घटना ही हलगर्जीपणातून झाली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अशा अनेक त्रुटीवर आधारित हा प्रकल्प कार्यरत आहे. असे अनेक गौप्यस्फोट केल्याने कालच्या बॉयलरच्या स्पोटापेक्षा त्यांनी केलेला गौप्यस्फोट जबरदस्त होता. याच प्रत्यय प्रकल्पात अनेकवेळा आल्याचेही त्यांनी कबुल केले आहे.उरण तालुक्यात ओएनजीसी, बीपीसीएल,जेएनपीए, धुतुम परिसरात अशाच अतिज्वलनशील रसायनांचा, खनिज तेलाचा, डीझेल, नाफ्ताचा, एलपीजीचा, खाद्य तेलाचा साठा साठविण्याची सोय येथील प्रचंड टाक्यांमध्ये आहे. हजारो मेट्रिक टनाच्या हिशेबात या ज्वलनशील पदार्थाची उलाढाल दैनंदिन होत असते.ती हाताळतांना सर्वप्रथम कामगाराच्या सुरक्षते विषयी नेमके कोणते धोरण अमलात आणले गेले याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपनी काही ठोस पावले उचलते का? कामगारांना कंपनीत सुरक्षा जँकीटे दिलेली आहेत का? हे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.त्याच बरोबरीने कंपनीच्या आतील अग्निशमन साधने, स्वंयचलीत यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत आहेत का ? याचीही वेळोवेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.काही वर्षा पूर्वी राज्य वीज निर्मिती गॅस टर्बाइनच्या याच प्रकल्पात रात्रीच्या वेळी अशाच प्रकारे बॉयलरचा स्पोट झाला होता व त्यावेळी येथिल प्रचंड मोठी विद्युत मोटार २५ फुटापेकक्षाही लांब उडाली होती. तर अशाच प्रकारचा हादरा २५ ऑक्टोबर २००८ रोजी शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या स्पार्किंगमुळे घडला होता. या मध्ये तीन कर्मचारी होरपळले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. आत्ता बॉयलर स्फोटात तीनही कामगारांचा मृत्यू झाला आहे.


Previous Post

शिंदे गटाला (बाळासाहेबांची सेना) मिळाले हे चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Next Post

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाबाबत झाला हा निर्णय

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाबाबत झाला हा निर्णय

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group