इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये विधिमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ अशी रचना असून न्यायव्यवस्थेला प्रचंड अधिकार दिले आहेत. साहजिकच न्यायालयाच्या कामकाजात न्यायमूर्तींना देखील खूप अधिकार असतात. भारतीय न्यायव्यवस्थेवर सर्व नागरिकांचा विश्वास असून ते न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतात. मात्र काही वेळा न्यायालयाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जातात. विशेषतः वकिलांकडूनच न्यायाधीश किंवा न्यायालयाचा अपमान होतो, अशाही घटना घडतात. त्यामुळे न्यायाधीश संतप्त होतात, असे आढळून आले आहे. कर्नाटकात असाच प्रकार घडला.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी वकिलांना न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेवर खोटे आरोप करू नयेत, असा इशारा दिला. त्यांनीअसेही सांगितले की, जर त्यांचे स्वत: काही चुकीचे केले असेल तर ते विधान-सौध म्हणजे राज्य विधानसभा) आणि कर्नाटक उच्च न्यायालय यांच्यामध्ये उभे राहून ते त्यांचे स्वतः शिर (डोके ) कापायला तयार आहेत.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांच्या निवृत्तीनिमित्त बड्डागालुरू अॅडव्होकेट्स असोसिएशनने आयोजित केलेल्या निरोप समारंभात न्यायमूर्ती वीरप्पा म्हणाले की, माझी काही चूक केली असेल तर शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्याचवेळी त्यांनी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक रेड्डी यांना असे आरोप करणाऱ्या सदस्यांना काही सल्ला देण्यास सांगितले.
काही वकिलांकडून न्यायाधीशांवर होत असलेल्या आरोपांमुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या निवेदनात रेड्डी म्हणाले की असोसिएशन या विषयावर चर्चा करेल. परंतु न्यायाधीश ‘काचेच्या घरात’ राहतात, पण त्यांचा सन्मान करण्यास विसरू नका. न्यायमूर्ती वीरप्पा म्हणाले की, न्यायाधीशांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही संघटनेची जबाबदारी आहे. चूक करणाऱ्या वकिलांवर न्यायव्यवस्था कारवाई करू शकते, असा इशाराही दिला.
Karnataka High Court Judge Veerappa b says I will cut my head if