नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी पाऊस पडल्यानंतर जून महिन्यामध्ये घरोघरी लोणचे तयार करण्यास सुरुवात होते. लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते. यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी दर जास्त आहे.
लोणचे तयार करण्याच्या मसाल्यासाठी लाल मिरची ,मोहरी डाळ, हिंग ,मीठ , हळद ,बडीशेप, लवंग, विलायची, धने आदि प्रकारचा मसाला लागतो. त्यानंतर कैऱ्या फोडून घ्याव्या लागतात. बाजारात कैऱ्या फोडण्याचे दर देखील वाढले आहेत. गरम तेलात टाकुन कैरीच्या फोडीला मसाला लावून मातीचे मडके किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे लोणचे अधिक चवदार बनते .
चटपटीत लोणचं नाश्ता, जेवणाची चव वाढवते, परंतु, अती लोणचं खाणे हे आरोग्यासाठी अपायकारक मानले गेले आहे. रोज लोणचं खाणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकत लोणचं पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं? पण लोणचं खाण्याचे गंभीर परिणाम आहेत, कारण आपल्या रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश असतो. परंतु, आहारात आरोग्यपूरक पदार्थांचा प्राधान्याने समावेश असावा, असे तज्ज्ञ सांगतात.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहारात बदल झाला आहे. परिणामी हृदयविकार, मधुमेह सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आहारात सॅलड, पालेभाज्या आणि फळांचा समावेश आवश्यक आहे. कोशिंबीर, चटणी, रायतं असे अनेक पारंपरिक पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असतात. या पदार्थांमध्ये लोणच्याचादेखील समावेश होतो. चटपटीत लोणचं नाश्ता, जेवणाची चव वाढवते, परंतु, अती लोणचं खाणे हे आरोग्यासाठी अपायकारक मानले गेले आहे.
रोज लोणचं खाणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. काही जण नाश्तामध्ये स्टफ्ड पराठे, लोणी आणि लोणचं आवर्जून खातात. परंतु, रोज लोणचं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. परंतु, तुम्हाला लोणचं खूपच आवडत असेल आणि कोणताही आजार नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा लोणचं खाऊ शकता. मात्र जर आजार असतील तर लोणचं खाणं टाळावं. कारण लोणचं दीर्घकाळ टिकावं, यासाठी त्यात मिठाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.
मिठात सोडियम असल्याने सर्वसामान्य लोक घरात रिफाइंड मिठाचा वापर करतात. या मिठात 97 ते 99 टक्के सोडियम क्लोराइड असतं. हे सोडियम क्लोराइड आरोग्यासाठी घातक असते `त्यातच पुन्हा लोणचं खाल्ल्याने प्रमाणापेक्षा कित्येकपट जास्त मीठ शरीरात जाते. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे शरीरात संतुलित प्रमाणात सोडियम जाईल, याकडं लक्ष देणं आवश्यक आहे.
पुरुषांनी रोज लोणचं खाऊ नये. कारण लोणच्यात मीठ जास्त असतं. त्यामुळे सेक्शुअल डिझायर आणि शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या वाढू शकते. त्यामुळे पुरुषांनी कमी प्रमाणात लोणचं खाणं आवश्यक आहे.
जेवणात जास्त प्रमाणात सोडियम असेल तर हृदयविकार होण्याची शक्यता बळावते, असं अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. सोडियममुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.
गर्भधारणेच्या काळात महिलांना लोणचं खाण्याची इच्छा होते. परंतु, जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्यास महिलांमध्ये ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी कमी प्रमाणात लोणचं खावं, असं तज्ज्ञ सांगतात. परंतु, जास्त प्रमाणात मीठ आणि मसाल्याचा वापर केलेला असल्यानं अल्सरचा धोका वाढतो. याशिवाय मीठ शरीरात साठून राहते. त्यामुळे अंगावर सूज येऊ शकते. प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्यानं किडनी आणि लिव्हर खराब होऊ शकतात.
Health Tips Pickle benefits side effects nutrition