बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हो, महिंद्राच्या कारखान्यात आता हिरोच्या इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती

जानेवारी 20, 2022 | 4:19 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या किमती गेल्या चार-पाच वर्षात प्रचंड प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. सहाजिकच अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहेत. गेल्या दोन वर्षापासून देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याला त्याच्या उत्पादनाचा वेग वाढवायचा आहे. याद्वारेच मागणी आणि पुरवठ्याचे गणित सुरळीत होणार आहे. याच माध्यमातून आज हिरो इलेक्ट्रिकने महिंद्रा अँड महिंद्रा सोबत करार केला आहे. त्यानुसार आता हिरो इलेक्ट्रिकच्या दुचाकी मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे असलेल्या महिंद्राच्या कारखान्यात तयार होतील.

हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या म्हणण्यानुसार, हिरो ऑप्टीमा आणि NYX सध्या महिंद्राच्या कारखान्यात तयार केले जातील. या करारामुळे आणि हिरो इलेक्ट्रिकच्या लुधियाना येथील कारखान्याच्या विस्तारामुळे, कंपनी यंदा म्हणजे मार्च 2022 पासून दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन सुरू करेल, असे हिरो इलेक्ट्रिकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ नवीन मुंजाल म्हणाले, या भागीदारीत दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्याबद्दल एकमेकांच्या सखोल ज्ञानाचा फायदा घेतील आणि पुढील काही वर्षांमध्ये नवीन उत्पादने तयार करतील. तर ऑटो अँड फार्म्सचे राजेश जेजुरीकर म्हणाले की, या धोरणात्मक भागीदारीचा फायदा होईल. दोन्ही व्यवसायांच्या एकत्रित ताकदीतून. काही दिवसांपूर्वी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगबाबत मोठा बदल केला होता. त्यानंतर आता ई-वाहन मालक त्यांच्या इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी घर किंवा ऑफिसमध्ये चार्ज करू शकतील. यासाठी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे बदलली आहेत. या अंतर्गत सध्याच्या वीज कनेक्शनवरूनच वाहन चार्ज करता येईल.

ईव्ही चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाच्या बाबी अशाः
सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारी जमिनीचा वापर केला जाईल. रेव्हेन्यू शेअरिंगच्या आधारावर 1/kWh दर निश्चित केला आहे. जमीन मालकीच्या एजन्सीला त्रैमासिक आधारावर पेमेंट केले जाईल. करार 10 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. अर्जावर लवकरच वीज जोडणी दिली जाईल. मेट्रो शहरांमध्ये पीसीएसला 7 दिवसांत वीज जोडणी. अन्य महापालिका क्षेत्रात 15 दिवसांत वीज जोडणी. ग्रामीण भागात 30 दिवसांत कनेक्शन. सार्वजनिक स्टेशनला वीज पुरवठ्यासाठी सिंगल पार्ट टेरिफ असेल. 31 मार्च 2025 पर्यंत वीज पुरवठ्याची सरासरी किंमत ओलांडणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फसव्या संदेशांची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतली गंभीर दखल; महावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार

Next Post

क्रिकेट मॅचवर फोन पे द्वारे ऑनलाइन सट्टा लावणार्‍या टोळीचे नाशिक कनेक्शन समोर; तीन जणांना अटक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
crime 1234

क्रिकेट मॅचवर फोन पे द्वारे ऑनलाइन सट्टा लावणार्‍या टोळीचे नाशिक कनेक्शन समोर; तीन जणांना अटक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011