अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात जनजागृती करण्यात येत असून त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. येवला तहसीलदार प्रमोद हिले व माणुसकी फाउंडेशन यांच्या तर्फे आज मनमाड जवळच्या अंकाई किल्ल्यावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संस्था,शाळेचे विद्यार्थी या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झाले होते.