India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तुम्हाला माहित आहे का? येथे चक्क विंचवासोबत खेळतात होळी

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विविध भाषा, धर्म, परंपरांचा देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. त्यामुळेच कोणताही सण असला तरी ती साजरा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. होळी साजरा करण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आहे. यातील एक पद्धत ऐकून तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, नव्हे अंगावर काटाच येईल. कारण येथे चक्क विंचवांच्या सहाय्याने होळी खेळली जाते.

उत्तर प्रदेशातील एक शहर कानपूर. त्यातील एक भाग इटावा. या इटावा भागातील एका गावात ही अजिबोगरीब प्रथा पहायला मिळते. फाल्गुन महिना आणि विशेषत: होळी आली, होळीची गाणी वाजू लागली की मोठ्या संख्येने विंचू बिळातून बाहेर येतात. आणि मग लहान मोठे सारेचजण हे विंचू हातात घेऊन एकमेकांवर फेकतात, आणि होळी साजरी करतात.

विंचू हा विषारी प्राणी असल्याने त्याचे नाव घेतले तरी आपल्याला धडकी भरते. पण इथे तर विंचू हे आपले मित्र असल्यासारखेच त्यांच्यासोबत ही होळी खेळली जाते. विशेष म्हणजे, हे विंचू कोणालाही डसत नाहीत. सगळ्या गोष्टी तर्काच्या, विज्ञानाच्या निकषांवर घासून मग त्यावर विश्वास ठेवण्याच्या काळात रहस्यकथा वाटावी अशी ही गोष्ट असली तरी ती खरी आहे. मुलेही अगदी बिनदिक्कतपणे या विंचवांना हात लावतात. इटावातील सौंथना गावातील ही प्रथा शेकडो वर्षांपासून अशीच सुरू आहे.

या गावाच्या बाहेर एक भैंसान नावाची छोटी टेकडी आहे. तेथे अनेक दगड आहेत. इतर दिवशी कधीही तुम्ही हे दगड उचलून पाहिलेत तर तुम्हाला काहीही दिसणार नाही. पण, होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही या टेकडीवर गेलात आणि होळीची गाणी म्हणायला सुरुवात केलीत, की अचानक शेकडोंच्या संख्येने विंचू बाहेर पडतात.

जिथे कालपर्यंत एकही विंचू नव्हता, तिथे एवढे विंचू येतात कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडतो. हे विंचू कोणालाच त्रास देत नाहीत. या गावातील ज्येष्ठ सांगतात की, हे विंचू होळीच्या दिवशी कोणालाच त्रास देत नाहीत. पण होळीनंतर जेव्हा हे विंचू सापडतात, तेव्हा मात्र ते हमखास डसतात. आणि त्यांच्या विषाचा त्रासही होतो. शिवाय, या टेकडीवरील दगड कोणी घरी ठेवण्यासाठी नेला तर घरातही विंचू निघतात.


Previous Post

WhatsAppवर होळीच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत; फक्त हे करा..

Next Post

आज आहे होळी पौर्णिमा; असे आहे तिचे महात्म्य आणि मुहुर्त

Next Post

आज आहे होळी पौर्णिमा; असे आहे तिचे महात्म्य आणि मुहुर्त

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group