पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – हिवाळा टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी घरी तयार केलेले देसी घी किंवा गावराणी तूपाचे लाडू अतिशय आरोग्यदायी मानले जातात. गहू, कुळीद, मेथी, जवस, सुका मेवा, डिंक आणि तीळ यांचे पारंपरिक पध्दतीने घरगुती लाडू हिवाळ्यात बनवले जातात. खरे म्हणजे हे लाडू बनवणे ही एक किचकट आणि लांबलचक प्रक्रिया आहे, ज्यात खूप वेळ लागतो, पण जर कमी वेळेत कोणतेही लाडू बनवायचे असतील तर खजूरचे लाडू हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच खजूरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. हिवाळ्यातील खास खजुराचे लाडू कसे बनवायचे ते जाणून घेऊ या
खजूर लाडू बनवण्याचे साहित्य
खजूर – 200 ग्रॅम, बदाम – 50 ग्रॅम,
काजू – 50 ग्रॅम, देशी तूप – 1 टीस्पून
पिस्ता – 4 किंवा 5तसेच अन्य सुकामेवा.
खजूर लाडू बनवण्याची पद्धत
प्रथम, खजूर धुवा आणि कोरडे ठेवा. खजुराचे पाणी सुटले की, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्याच प्रकारे काजू आणि बदाम बारीक वाटून घ्या, आता एका पातेल्यात देशी तूप टाका आणि गरम करा. त्यानंतर खजूर घालून 2 मिनिटे परतून घ्या. आता गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी ताटात ठेवा आणि आता सर्व शेंगदाणे घाला आणि मिक्स करा आणि लहान लाडू बनवा. आता स्वादिष्ट आणि आरोग्यदायी लाडूंचा आस्वाद घ्या. खजूर गोड असतात, पण जर जास्त गोड खाण्याची इच्छा असेल तर लाडूंमध्ये मध किंवा पिठीसाखर टाकू शकता.