गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सावधान! थायरॉईडमुळे होतात हे गंभीर आजार; अशी असतात लक्षणे

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 9, 2022 | 5:12 am
in राज्य
0
Thyroid Women

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात नवनवीन आजार वाढत असताना काही जुनेच आजार देखील डोके वर काढत आहेत. त्यातच थायरॉईडचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून महिलांमध्ये थायरॉईड चे प्रमाण अधिक दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जीवनशैली आत्मसात करणार्‍या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनली असून थायरॉईडच्या 100 रुग्णांमध्ये 80 रुग्ण या महिला असतात, असे एका अध्ययनातून समोर आले आहे.

थायरॉइडची लक्षणे :
वजन वाढणे, चेहरा, पाय यांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे होय.
हायपर-थायरॉइडची लक्षणे :
यात शरीराच्या आवश्यकतेपेक्षा थायरॉइड संप्रेरके जास्त प्रमाणात स्त्रवली जातात. परिणामी, आहार सामान्य असूनही वजन कमी होते, अतिसार होतो, चिंतातूरता निर्माण होते, हात व पाय थरथरतात, उष्णतेचा खूप त्रास होणे, स्वभावात तीव्र चढ-उतार, स्लीप अॅप्निया (झोपेत श्वसन बंद होणे), हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक होणे, दृष्टी धुसर होणे, मेंटल फॉग इत्यादी लक्षणे दिसू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉईड म्हटले जाते. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉईड हार्मोन म्हटलं जाते. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात.थायरॉईड हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असते आणि थायरॉईड ग्रंथीला सूज येते. थायरॉईडचा आजार लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. थायरॉईड संप्रेरक अनेक प्रकारे चयापचय नियंत्रित करते, ज्यामध्ये वजन वेगाने नियंत्रित करता. थायरॉईड संप्रेरक हृदय गती, पचन, वजन, मानसिक आरोग्य आणि ऊर्जा पातळी प्रभावित करतात.

जेव्हा काही वेळा जास्त काम केले तरी तुम्हाला थकावटीची जाणीव होते किंवा वजन अचानक वाढायला लागते किंवा शरीराच्या विविध भागांत मंद दुखायला लागतात किंवा त्वचा आणि केसांमध्ये कडकपणा जाणवायला लागतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नेहमी ताण-तणावात दिसू लागतात, तेव्हा तुम्हालाही कादाचित हायपोथायराइडिज्मची समस्या आहे, हे लक्षात येऊ शकते.

उपाय
कॅफीन आणि शर्करेचं प्रमाण एकदम कमी करा. याशिवाय, शरीरात शर्करेचे प्रमाण वाढवणार्‍या इतर पदार्थांचे प्रमाणही कमी करा. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिनच थायरॉईड हार्मोन्सला ढकलून टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचे प्रमाण वाढवल्याने थायरॉईडची कार्यप्रणाली सामान्य केली जाऊ शकते. या आजारात वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.

हार्मोन्सचं संतुलन बिघडते
वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा रुग्ण फॅट सोडून देतात यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडते. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची जरुर काळजी घ्या. थायरॉइडची अनेक लक्षणं पोषक पदार्थांच्या सेवनाने दूर होऊ शकतात. या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा

पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त
थायरॉईड नियंत्रणात न राहिल्यास अनेक आजारांचा धोका वाढू लागतो. थायरॉईड रोग पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रभावित करतो. आहारात सोया पावडर, सोया प्रोटीन आणि सोया कॅप्सूलचे जास्त सेवन केल्याने थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. थायरॉईडवर नियंत्रण न ठेवल्यास लठ्ठपणामुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. विशेषतः थायरॉइडच्या रुग्णांनी थायरॉईड आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. फायबरचे अधिक सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होते. फायबरच्या सेवनाने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि वजन नियंत्रणात राहते. थायरॉईडचे रुग्ण दररोज भाज्या, धान्ये, कडधान्ये यांचे सेवन करून आरोग्य चांगले ठेऊ शकतात.

आहारात हे हवे
थायरॉईडमुळे वाढलेला लठ्ठपणा नियंत्रित करायचा असेल तर आहारात मीठ, मासे, अंडी असे आयोडीनयुक्त पदार्थ खा. हे पदार्थ थायरॉईड संप्रेरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे जीवनसत्व थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी, दररोज सकाळी १५ मिनिटे उबदार सूर्यप्रकाश घ्यावा.

Health Tips Thyroid Serious Diseases Control Treatment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वय वर्षे ५०… अतिशय व्यस्त कामकाज… अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या फिटनेसचे रहस्य काय?

Next Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता बिनधास्त घ्या सेकंड हँड कार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता बिनधास्त घ्या सेकंड हँड कार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011