इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट असो की बॉलीवूड मधील अभिनय या क्षेत्रात फिटनेसला खूप महत्त्वाचे स्थान असते, त्याशिवाय क्षेत्रात खूप वर्ष उभे राहता येत नाही, एक अभिनेत्री देखील असेच अनेक वर्ष काम करत असून तिचे नाव मंदिरा बेदी आहे. मंदिरा बेदी हिचा जन्म दि. १५ एप्रिल १९७२ रोजी कोलकाता येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचे नाव गीता बेदी आहे.
मंदिरा बेदी आपले सुरुवातीचे शिक्षण दक्षिण मुंबईतील कॅथर्डल स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीधर होऊन सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमधून मीडियामध्ये पीजी डिप्लोमा केला आहे. त्यानंतर मंदिरा बेदी हिने चित्रपट दिग्दर्शक राज कौशलसोबत लग्न केले आहे. त्यांना एक वीर नावाचा एक मुलगा आहे. मंदिरा बेदीने छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो शांतीमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये तिने शांतीची भूमिका साकारली होती. शोमधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट दिग्दर्शक इतका प्रभावित झाला की, तिला चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. या शोनंतर तिने आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये काम केले.
दूरदर्शन वरील शांतीच्या ह्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत काम केल्यानंतर ती एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही शो क्यूंकी सास भी कभी बहू थीमध्ये दिसली. अभिनयासोबतच ती कॉमेडी शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे, तसेच अनेक रिअॅलिटी शोची अँकरही आहे. मंदिरा बेदी चारू शर्मासोबत एक्स्ट्रा इनिंग्स या क्रिकेट शोमध्येही दिसली आहे. २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. तिच्या समालोचना ऐवजी क्रिकेट खेळा दरम्यानच्या तिच्या वेशभूषेमुळे ती जास्त चर्चिली गेली. तसेच या अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून अनेक दंग असतात. सध्या मंदिरा ५० वर्षांची आहे, पण तिचा फिटनेस पाहून सगळेच थक्क होतात. अलीकडेच मंदिरा बेदीने तिचा फिटनेस मंत्र इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्यावर तिच्या चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत.
विशेष म्हणजे मंदिराने तिच्या फिटनेसचे रहस्य इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, त्यात तिने तिच्या वर्कआउटबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याचे वजन वाढले होते, ते तिने कमी करून आता ५५ केले आहे. मात्र तिला ते ५२ किलो करायचे आहे त्यासाठी ती प्रयत्न करत आहे. सध्या ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच फिटनेस आयकनही आहे. वयाच्या ५० व्या वर्षीही तिचा फिटनेस एका कॉलेजच्या तरूणीप्रमाणे आहे.
मंदिरा नियमित व्यायाम करते तसेच व्यायामाशिवाय डाएट बद्दल खूप काळजी घेते, तिला साधे जेवण आवडत असून व्यायामापूर्वी ती फक्त एक केळ खाते आणि दुपारी भाजी, डाळ आणि चपाती खाते. रात्री ती लाईट जेवण घेते आणि त्यात ती चपाती घेत नाही. तिच्या फिटनेसचे सर्वांनाच कौतुक वाटले. तसेच ती कायमच सोशल मीडियावर योग आणि व्यायाम करतानाचे आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आठवड्यातून पाच दिवस ती वर्कआऊट करते. याशिवाय ती जिम, स्विमिंग आणि रनिंगही करते. प्रवासादरम्यानही ती व्यायाम सोडत नाही. तिचा आदर्श आणि तरुणींनी आणि महिलांनी घेणे फायद्याचे ठरणारे आहे.
Actress Mandira Bedi Health Body Fitness
Entertainment