इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राममधील सेक्टर ५२ मध्ये अतिशय संतापजनक घटना घडल आहे. एका अल्पवयीन नराधमाने ४ वर्षांच्या मुलीवर कथित बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कार करुन अल्पवयीन नराधम थांबला नाही तर त्याने मुलीच्या तोंडात लघवीही केली. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला पकडून बालसुधारगृहात पाठवले आहे.
पोलिसांनी शनिवारी सांगितले की, आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध बादशाहपूर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलाला शनिवारी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आणि तेथून त्याची फरिदाबाद येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी ती कामावर गेली असताना ही घटना घडली. तिची मुलगी घरी एकटीच होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी संध्याकाळी बाहेर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
महिलेने सांगितले की, मी संध्याकाळी उशिरा घरी परतल्यावर मला माझ्या मुलीची प्रकृती बिघडलेली दिसली. पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. मी हट्ट केल्यावर तिने मला सांगितले की शेजारच्या एका मुलाने तिच्यावर बलात्कार केला आहे. तिने सांगितले की, माझी मुलगी शॉकमध्ये आहे. तसेच, मला मोठा धक्का बसला जेव्हा तिने मला सांगितले की, आरोपीने तिच्या तोंडात लघवीही केली. ज्यामुळे तिच्या पोटात संसर्ग झाला आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. सेक्टर ५३ पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी सुमारे १५ वर्षांचा आहे. आम्ही त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले आणि त्याला फरिदाबाद येथील सुधारगृहात पाठवले. तपास सुरू आहे.
Crime Gurugram Minor Girl Rape Pocso