पुणे – आपल्या प्रत्येकाच्या शरीररचनेत केसाला महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: युवावर्गाला आकर्षक केशरचना करण्याची आवड असते. त्यातही युवतींना सुंदर आणि आकर्षक केसांची हौस असते. त्यामुळे केस गळु नये म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करतो.
आपले केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे ताणतणाव, मानसिक समस्या आणि शरीरातील जीवनसत्त्वे आणि हार्मोन्समधील बदल होय, असे डॉक्टर म्हणतात. परंतु काही वेळा खाण्यापिण्याच्या वाईट सवयी केस गळण्याचे मुख्य कारण बनतात. केसांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि केस गळतीस कारणीभूत पदार्थ कोणते ते जाणून घेऊ या…
जंक फूड
आजकाल काही लोकांना पौष्टीक खाण्यापेक्षा फ्रेंच फ्राय, पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे केस गळण्याची समस्या तीव्र होते. तसेच केसही जलद गतीने पडत असतील तर जंक फूडचा वापर थांबवा किंवा कमी करा.
सोडा व सॉफ्ट ड्रिंक्स
उन्हाळ्यात सोडा किंवा शीतपेयांचे सेवन केल्याने उष्णतेपासून त्वरित आराम मिळते, परंतु ते सेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. सोडा सेवन केल्याने शरीरात साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि केवळ आपल्या केसांवरच नव्हे तर आपल्या हृदयावरही वाईट परिणाम होतो.
मद्यपान आणि धूम्रपान
मद्यपान आणि धूम्रपान केल्याने केस गळण्याची समस्या वाढते. मद्यपान केल्याने केस गळतीचे प्रमाण वाढते. केस प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनेपासून बनलेले असतात. या प्रथिने अल्कोहोलच्या सेवनाचा वाईट प्रभाव पडतो, त्यामुळे केस कमकुवत होते आणि चमक कमी होते.
मैद्याचे पदार्थ
खारी, टोस्ट , बिस्किटे, मॅगी आदि मैदापासून बनवलेल्या गोष्टींचा आपल्या पचन व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. मैदाच्या सेवनामुळे आतडे हो अन्न योग्य प्रकारे शोषण्यास सक्षम नसते, त्यामुळे शरीरात अशक्तपणा वाढतो, आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते.
(सूचना – कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)