बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अतिशय गंभीर! गुजरातमधून गेल्या ५ वर्षात एवढ्या कोटींचे ड्रग्ज जप्त

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 16, 2021 | 3:22 pm
in राष्ट्रीय
0
FENywykVgAI4GtH

अहमदाबाद – ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांची तस्करी हा जगभरातील अनेक देशांचा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षात परदेशातून विशेषत: पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर भारतात या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने समस्या निर्माण होत आहे. विशेष म्हणजे तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवून भारताच्या विकासाला खीळ घालण्याचे या परकीय शक्तींच्या कारवाया थांबविण्यासाठी एटीएस कडून विशेष प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून गुजरातमध्ये एटीएस पथकाने गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करून विशेष कामगिरी बजावली आहे.

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ( एटीएस) सन २०१६ पासून आतापर्यंत गेल्या ५ वर्षात १९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून त्यापैकी यंदा २०२१ मध्ये ९०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या काळात एटीएसने अंमली पदार्थाशी संबंधित काही मोठ्या प्रकरणांमध्ये ७० हून अधिक समाजकंटकांना अटक केली आहे. पाकिस्तानातील तस्कर या विघातक कारवायांसाठी गुजरातच्या किनारपट्टीचा वापर वापर करत आहेत. कारण आपल्याकडे १,६००किमीचा समुद्रकिनारा आहे, त्यामुळे हे साध्य करण्यासाठी सर्व दहशतवादी यंत्रणा समन्वयाने हे विघातक काम करतात.

विशेषत: गेल्या ४ वर्षांत मादक द्रव्ये विशिष्ठ ठिकाणी नेण्यासाठी खूप प्रयत्न झाले, परंतु असे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले. यावर्षी विविध कारवायांमध्ये ९०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यामध्ये मोरबी जिल्ह्यातून रविवारी जप्त केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या १२० किलो ड्रग्ज सह अन्य साहित्याचा यात समावेश आहे, हा साठा एका पाकिस्तानी तस्कराने पाठवला होता आणि समुद्रमार्गे गुजरातच्या किनारपट्टीवर आणला होता, असेही ते म्हणाले.

२०१६ पासून एटीएस पथकाने हेरॉईन, मॅन्ड्रेक्स, मेथॅम्फेटामाइन किंवा एमडी, चरस आणि ब्राऊन शुगरसह विविध अंमली पदार्थ जप्त केले आहेत, या वर्षी सप्टेंबरमध्ये, एटीएसने, भारतीय तटरक्षक दलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, गुजरात किनार्‍याजवळील अरबी समुद्रात इराणी मासेमारी बोटीने आणलेले १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन जप्त केले.

गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक हिमांशू शुक्ला यांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रग तस्कर हे गुजरातच्या किनारपट्टीचा वापर तस्करीच्या उद्देशाने गुप्त मार्ग म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न राज्य पोलीस आणि तटरक्षक दलाने हाणून पाडले आहेत. आणि भविष्यातही असा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले. एटीएस, आयसीजी आणि सागरी पोलिसांनी समुद्रात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदार सुहास कांदे DPDC बैठकीत आक्रमक; बैठकीनंतर म्हणाले…. (व्हिडिओ)

Next Post

पुण्यात घर घ्यायचं आहे? ही आहे सुवर्णसंधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
pune home

पुण्यात घर घ्यायचं आहे? ही आहे सुवर्णसंधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011