नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल. गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत पण तिथल्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राजीव कुमार यांनी गुजरातमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर न करण्याचे कारणही सांगितले आहे. असे करताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी नाकारले.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असल्याचे कळताच हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, अशी अटकळ बांधली जात होती. दोन राज्यांत विधानसभेचा कार्यकाळ सहा महिन्यांत संपला तर एकाच वेळी निवडणुका होतात आणि निकाल एकाच वेळी जाहीर होतात. गुजरात निवडणुकीच्या तारखांची घोषणा न करण्याच्या प्रश्नावर राजीव कुमार म्हणाले की, कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. ते म्हणाले की,”दोन्ही राज्यांच्या विधानसभेच्या कार्यकाळात ४० दिवसांचा फरक आहे. नियमांनुसार, तो किमान ३० दिवसांचा असावा जेणेकरून एकाच्या निकालाचा दुसऱ्यावर परिणाम होणार नाही.
गुजरातपूर्वी हिमाचलमधील निवडणुकांबाबत आयुक्त म्हणाले की, “हवामान सारखे अनेक घटक आहेत, आम्हाला हिमाचलमध्ये बर्फवृष्टीपूर्वी निवडणुका हव्या आहेत.” निवडणूक आयोगाने अनेक संबंधितांशी सल्लामसलत केली आहे. आचारसंहितेचा कालावधीही ७० दिवसांवरून ५७ दिवसांवर आणण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २०१७ मध्ये, दोन्ही राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या आणि डिसेंबरमध्ये एकाच वेळी निकाल जाहीर झाले. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले.
गुजरातमध्ये या कालावधीत मतदान शक्य
गुजरात आणि हिमाचलमध्ये हे लगतच्या तारखांना होत आहे आणि त्याच वेळी निकालही जाहीर केले जातात. २०१२ आणि २०१७ प्रमाणे यावेळीही दोन्ही राज्यांतील मतमोजणी एकाच वेळी ८ डिसेंबर रोजी होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग दिवाळीनंतर गुजरातमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. १२ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान गुजरातमध्ये होऊ शकते. येथे दोन टप्प्यात मतदान होऊ शकते.
Gujrat Election Dates not Declare by Commission