बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2022 | 2:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221115 WA0008

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, महानगरपालिकेचे उपायुक्त अर्चना तांबे यांच्यासह वरिष्ठ श्री कोश्यारी यांचे स्वागत केले.

आदिवासी विभागाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 3 वाजता आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे तसेच स्वातंत्र्यलढा व राष्ट्र निर्मितीमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण व त्यांचा गौरव करण्यासाठी आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि.15 ते 18 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत, पारंपरिक नृत्य स्पर्धा सायंकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत, 17 व 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8.30 वाजता लघुपट महोत्सव होणार आहे. तसेच या महोत्सवात आदिवासी बांधवांच्या हस्तकलांचे साधारण 210 स्टॉल लावण्यात येणार असून अंदाजे 42 नृत्यपथके या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

या महोत्सवास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, छगन भुजबळ, किशोर दराडे, दिलीप बोरसे, ॲड माणिकराव कोकाटे, मोहम्मद खालिक, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढिकले, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज अहिरे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम व तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Governor Bhagat Singh Koshyari Nashik Visit

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘आम्ही ब्राह्मण, बुध्दीजिवी आणि स्वाभिमानी आहोत, याचा आम्हाला अभिमान’, अमृता फडणवीस यांचे वक्तव्य चर्चेत

Next Post

राज्यातील १७५ वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळणार; नाशिकच्या या अधिका-यांचा समावेश

India Darpan

Next Post
police

राज्यातील १७५ वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळणार; नाशिकच्या या अधिका-यांचा समावेश

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011