नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील १७५ वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती देण्यात येणार असून त्यातील शहर पोलिस आयुक्तालयातील आठ वरिष्ठ निरीक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. पंचवटी, भद्रकाली, उपनगर, सरकारवाडा, इंदिरानगर, सहायक आयुक्त पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यात प्रामुख्याने नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पंचवटी पोलिस ठाण्याचे डॉ. सीताराम कोल्हे, भद्रकाली पोलिस ठाण्याचे दत्ता पवार, सरकारवाड्याचे साजन सोनवणे, इंदिरानगरचे संजय बांबळे, उपनगरचे नीलेश माईनकर, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ, प्रभाकर घाडगे, हेमंत सोमवंशी या अधिकार्यांना पदोन्नती मिळणार आहे. या अधिकार्यांकडून तीन पसंती ठिकाणे मागविण्यात आली आहे.
राज्यातील या पदोन्नतीमध्ये १९९१ ते १९९३ बॅचचे अधिकारी असून यामध्ये नाशिकसह मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या अधिकार्यांची सहायक आयुक्त अथवा या ५ पोलिस ठाण्याचे निरीक्षकपद रिक्त होणार आहे. या रिक्त जागेवर आयुक्तालयातील २ ते ३ वरिष्ठ निरीक्षक आणि नवीन अधिकार्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निरीक्षकपदाचा १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्यांना सहायक आयुक्त पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.