पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा एकदा कोश्यारी आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संबंधित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकारांना रेकॉर्डिंग करीत उभे होते. छायाचित्रकारांच्या मागे एक महिला बसली होती. छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला.
कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’. इतकंच नव्हे. तर भाषण सुरू असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छायाचित्रकारांनादेखील बाजूला व्हायचे आदेश दिले. मात्र, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सातत्याने आपल्या वक्तव्यांनी राज्यपाल वादात व चर्चेत येत असल्याने त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येते.
Governor Bhagat Singh Koshyari Again one Controversial Statement