India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; बघा, आता काय म्हणाले ते?

India Darpan by India Darpan
December 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा एकदा कोश्यारी आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

संबंधित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकारांना रेकॉर्डिंग करीत उभे होते. छायाचित्रकारांच्या मागे एक महिला बसली होती. छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला.

कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’. इतकंच नव्हे. तर भाषण सुरू असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छायाचित्रकारांनादेखील बाजूला व्हायचे आदेश दिले. मात्र, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सातत्याने आपल्या वक्तव्यांनी राज्यपाल वादात व चर्चेत येत असल्याने त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येते.

Governor Bhagat Singh Koshyari Again one Controversial Statement


Previous Post

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकावरुन गदारोळ; पुरस्कार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

Next Post

रेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

Next Post

रेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group