India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सरकारने केले ६६१५ एकर जागेचे भूसंपादन… त्यावर झाले मोठे अतिक्रमण… अखेर मंत्र्यांनी दिले हे निर्देश

India Darpan by India Darpan
April 13, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दापचेरी (जि.पालघर) येथे दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने दुग्ध व्यवसाय विकास, महसूल, भूमी अभिलेखच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण जमिनीचा सर्व्हे करून मोजणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित दुग्ध व्यवसाय विकास आढावा बैठकीत मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते.

मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, दापेचरीमध्ये मुंबईतील तबेले आणून येथे स्वतंत्र दुग्ध प्रकल्प करण्याचा शासनाचा विचार होता. यासाठी सुमारे ६६१५ एकर जमिनीचे भूसंपादन झाले होते. याठिकाणी तबेलेही करण्यात आले होते. एक स्वतंत्र धरणही बांधण्यात आले होते. मात्र त्या जागेचा वापर कधी झाला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. जादा मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास देण्यात येईल. याठिकाणच्या दिशा, नकाशा ठरविण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमून काम करावे. तबेल्याव्यतिरिक्त अतिक्रमित जागा, आरे दूध डेअरी परिसरातील अतिक्रमण, झोपड्या हटविण्यासाठी अतिक्रमण आणि पोलीस पथकाची नेमणूक करण्याच्या सूचनाही श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

दापचेरी येथील प्रकल्पाच्या ठिकाणी २५० कंट्रोल मार्क केले असून ३० एप्रिलपर्यंत ड्रोन सर्व्हे पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आदी उपस्थित होते.

Government Land Acquisition encroachment Minister Order


Previous Post

उन्हाळी सुट्टीसाठी या शहरांसाठी धावणार एसटीच्या जादा बसेस; उद्यापासूनच मिळणार लाभ

Next Post

वृक्षतोडीविरोधात नाशिक मनपा आक्रमक; शाळेसह मंगल कार्यालयावर गुन्हा दाखल

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

वृक्षतोडीविरोधात नाशिक मनपा आक्रमक; शाळेसह मंगल कार्यालयावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group