India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तब्बल ११६६ सरकारी पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in संमिश्र वार्ता
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात अनेक शिक्षण घेतलेले तरुण बेरोजगार आहेत त्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा असते, परंतु सरकारी नोकरी नाही मिळाली तर एखाद्या कार्पोरेशन मध्ये तरी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते ती अपेक्षा आता पूर्ण होऊ शकते, कारण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) इलेक्ट्रीशियन आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 1166 पदे भरण्यात येणार आहेत. दि. 31 जुलै 2022 पर्यंत उमेदवार PGCILच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत, कॉर्पोरेट सेंटर, गुरुग्राम, फरिदाबाद, जम्मू, लखनऊ, पाटणा, कोलकाता, शिलाँग, ओडिशा प्रकल्प, भुवनेश्वर, नागपूर, बडोदा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे भरती केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना NAPS किंवा NATS वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरूवात झालेली तारीख – दि. 7 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 31 जुलै 2022

शैक्षणिक पात्रता :
A ) इलेक्ट्रीशियन – इलेक्ट्रीशियनमध्ये आयटीआय व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा.
डिप्लोमा (सिव्हिल) – सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.
ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.
B ) एचआर एक्झिक्युटिव्ह – एमबीए (एचआर) / कार्मिक व्यवस्थापनात पदव्युत्तर डिप्लोमा.
C ) सीएसआर एक्झिक्युटिव्ह – मास्टर इन सोशल वर्क (MSW) किंवा रुरल डेव्हलपमेंट.

किती वेतन मिळेल?
ग्रॅज्युएट- 15,000 रुपये
एक्झिक्युटिव्ह 15,000 रुपये
डिप्लोमा- 12,000 रुपये

कोण अर्ज करू शकत नाही?
– ज्यांचे अंतिम परीक्षेचे निकाल आलेले नाहीत.
– ज्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत.
– कोणत्याही कालावधीसाठी कोणत्याही संस्थेमध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे.
– ज्याच्याजवळ 1 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे.

Government Job PGCIL Vacancy Recruitment


Previous Post

ईव्हीयमने लॉन्च केल्या या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; एवढी आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

Next Post

सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधी पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधी पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे

ताज्या बातम्या

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group