India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सर्व सरकारी दवाखाने होणार चकाचक; आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर यंत्रणा कामाला

India Darpan by India Darpan
April 7, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आसिमा मित्तल उपसंचालक डॉ कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते यांचे सनियंत्रणात
7 एप्रिल 2023 जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या 112 प्राथमिक आरोग्य केंद्र 592 आरोग्य उपकेंद्र 32 ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय स्त्री व बाल रुग्णालय या ठिकाणी सदर उपक्रम राबविला जाणार आहे यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य सर्वांसाठी आरोग्य हे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून सर्वांना आरोग्य विषयीच्या समान सुविधा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल 2023 या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे यामध्ये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील दवाखाना परिसराची स्वच्छता,त्यातील सर्व विभागाची स्वच्छता, तसेच स्वच्छतागृहे, भांडारगृहे, इत्यादीची स्वच्छता करण्यात येणार आहे.

तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आवारात दर्शनी भाग सुशोभीकरण रंगरंगोटी करण्यात येणार आहे तसेच आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचे फलक जनजागृती चे फलक बॅनर पोस्टर अद्यावत केले जाणार आहेत त्यामुळे जनतेने सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सुविधांचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा यासाठी वरील कालावधीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे आरोग्य विभागाच्या या दवाखान्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या दर शनिवारी स्वच्छता दिवस राबवण्यात येतच असतो परंतु हा स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवला जावा हे उद्दिष्ट समोर ठेवून सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना पुढे येत आहे.

आरोग्य विभागामार्फत सेवा दिल्या जातात त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी रुग्ण कल्याण समिती स्थानिक स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे जिल्हास्तरावरून संस्थांना भेटी दिल्या जाणार आहेत तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ चांगल्या व चांगल्या प्रतीच्या आरोग्यसेवा कशा देतील स्वच्छ नीटनेटक्या कशा राहतील याकडे लक्ष दिले जाणार आहे.

या उपक्रमाचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक डॉ कपिल आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार डॉ राठोड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी
डॉ कैलास भोये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी केले आहे.

Government Hospital Cleanliness Campaign


Previous Post

खते, बियाणे व किटकनाशकांबाबत तक्रार आहे? तातडीने या भरारी पथकांना फोन करा

Next Post

विमा न भरता शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत; तुम्हालाही मिळू शकतो असा लाभ, फक्त हे करा

Next Post
प्रातिनिधीक फोटो

विमा न भरता शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत; तुम्हालाही मिळू शकतो असा लाभ, फक्त हे करा

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group