रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चक्क यामध्ये लपवले होते तब्बल ३६ किलो सोने; अधिकारीही चक्रावले, असा उधळला तस्करीचा कट

by Gautam Sancheti
जानेवारी 25, 2023 | 1:05 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
4PM7E9U

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोन्याची तस्करी करणाऱ्या एका गटाचा डाव उधळला आहे. त्यामुळेच तब्बल सुमारे 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने हस्तगत करण्यात डीआरआयला यश आले आहे.

मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलामधील सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान, काही परदेशी नागरिकांचा गट तस्करी केलेल्या सोन्यावर प्रक्रिया आणि त्याचे वितरण करत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या तस्करी केलेल्या सोन्याची किंमत हवाला मार्गे केली जात असल्याची माहिती देखील प्राप्त झाली होती.

सिंडिकेटचा डाव उधळून लावण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि संशयित भारतीय नागरिकांच्या प्रवासाच्या विशिष्ट पद्धतीवर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काळजीपूर्वक पाळत ठेवली होती. सोमवार, 23.01.2023 रोजी, डीआरआय मुंबईच्या अधिका-यांनी गुप्त माहितीच्या आधारावर, एक योग्य वेळ साधून आणि समन्वित कारवाईचे नियोजन केले आणि अंमलात आणली. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत, डीआरआय अधिकार्‍यांच्या पथकाने ज्या संशयित जागेवर तस्करी केलेले सोने वितळणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती, त्या जागेची झडती घेतली.

या परिसराची कसून झडती घेतल्यावर, प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेले 36 किलोपेक्षा जास्त वजनाचे बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 21 कोटी रुपये इतके आहे. या परिसराच्या प्रभारी व्यक्तीने कबुली दिली की, आपल्याला हे सोने विदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून शरीरात लपवलेल्या कॅप्सूलच्या स्वरूपात, प्रवासी बॅग मधून, कपड्यांच्या थरात लपवून तसेच विविध प्रकारच्या मशीनच्या माध्यमातून मिळाले. या व्यक्तीकडे 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड देखील आढळून आली.

चौकशी आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, या सिंडिकेटद्वारे चालवल्या जाणार्‍या कोडच्या आधारे हे सोने दररोज देशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना (तस्करांना) वितरीत केले जात होते. या तपासात प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या पुराव्यांमधून, तस्करीसाठी सोने लपवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उघडकीला आल्या.

देशात वेगवेगळ्या स्वरूपात सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या संघटनांना आळा घालण्यासाठी, योग्य पाळत ठेवून, डीआरआयचे अधिकारी सुसूत्रपणे राबवत असलेल्या कारवाईची ताकद या कारवाईमधून दिसून येते. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. देशात तस्करी केलेल्या सोन्याची बेकायदेशीर आवक उघडकीला आणण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Gold Smuggling Racket Burst by DRI in Mumbai Crime

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टोलनाक्यावरील झोल मिटला! फास्टटॅगमुळे पथकर संकलन तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढले

Next Post

सावधान! चीनचा कुटील डाव; भारतात पाठवली जाताय किटकनाशके, अशी उघड झाली तस्करी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या

आज शरद पवार घेणार आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट…

ऑगस्ट 31, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयची मोठी कारवाई….२३२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी विमानतळाचा हा अधिकारी गजाआड

ऑगस्ट 31, 2025
fir111
आत्महत्या

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
manoj jarange
संमिश्र वार्ता

कधीपर्यंत भाजपची री ओढणार…राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांची टीका

ऑगस्ट 31, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 30, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली आणखी एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 30, 2025
udhav 11
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन…दीड ते दोन मिनिट चर्चा

ऑगस्ट 30, 2025
Gzl81fKWwAE3m6S 1920x1091 1
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन….

ऑगस्ट 30, 2025
Next Post
C65Q

सावधान! चीनचा कुटील डाव; भारतात पाठवली जाताय किटकनाशके, अशी उघड झाली तस्करी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011