India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सावधान! चीनचा कुटील डाव; भारतात पाठवली जाताय किटकनाशके, अशी उघड झाली तस्करी

मुंबई सीमा शुल्क विभागाने उघडकीला आणली सुमारे 16.8 कोटी रुपये किमतीच्या कीटकनाशकांची तस्करी

India Darpan by India Darpan
January 25, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतामध्ये तस्करीद्वारे चीनकडून कीटकनाशके पाठविली जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) याचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे तब्बल १६ कोटी रुपयांची किटकनाशके डीआरआयने जप्त केली आहेत.

चिनी पुरवठादारांच्या सक्रीय संगनमताने भारतात तस्करी होत असलेल्या कीटकनाशकांचे अनेक साठे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), मुंबई विभागीय युनिटने जप्त केली आहेत. ही तस्करी एका गटाद्वारे केली जात होती. यामध्ये ‘विनाइल एसीटेट इथिलीन कॉपॉलिमर’ अशा नावाने, क्लोराँट्रानिलिप्रोल, अबॅमेक्टिन बेन्झोएट इत्यादी नावाची कीटकनाशकांची तस्करी केली जात होती. या कारवाईत सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत सुमारे 16.8 कोटी रुपये किमतीच्या 30 मेट्रिक टन वजनाची खेप (कन्साईन्मेंट) जप्त करण्यात आली. चाचणी अहवालात हा माल कीटकनाशक असल्याचे निश्चित झाले आहे.

कीटकनाशकांच्या आयातीसाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाची कायदेशीर परवानगी आवश्यक आहे. कायद्या अंतर्गत, पुरवठादार/उत्पादकांसह आयातदाराला मंडळा द्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे. कीटकनाशके वापरण्यापूर्वी योग्य दर्जाच्या मानकांची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. या सर्व गरजा तस्करांनी धुडकावून लावल्या. निकृष्ट कीटकनाशकांचा वापर निसर्गासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तसेच, जप्त करण्यात आलेली काही कीटकनाशके पेटंट उत्पादने होती आणि ती आयपीआर नियमांचे उल्लंघन करून आणली जात होती.

तपासादरम्यान, जप्त करण्यात आलेल्या काही पुराव्यांवरून असे दिसून येते अशा प्रकारची तस्करी बऱ्याच काळापासून सुरू आहे. हा गट चिनी पुरवठादारांच्या संगनमताने कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तस्करी सुलभ करण्यासाठी चिनी पुरवठादार हेतुपूर्वक, त्यांच्या कागदपत्रांमध्ये कीटकनाशकांना विनाइल एसीटेट इथिलीन कॉपॉलिमर म्हणून चुकीचे घोषित करत होते. तस्करी केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीतून मिळणारी अवैध रक्कम हवाला नेटवर्कद्वारे चिनी पुरवठादारांना पाठवली जात होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्यांनी यापूर्वी 300 मेट्रिक टन पेक्षा जास्त कीटकनाशकांची तस्करी केली आहे ज्याची अंदाजे किंमत 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. या प्रकरणांचा पुढील तपास सुरु आहे.

China Smuggling Pesticides in India DRI Action


Previous Post

चक्क यामध्ये लपवले होते तब्बल ३६ किलो सोने; अधिकारीही चक्रावले, असा उधळला तस्करीचा कट

Next Post

सावकाराचा चेक बाउन्स झाला, न्यायालयाने आरोपीला ठोठावली ही शिक्षा

Next Post

सावकाराचा चेक बाउन्स झाला, न्यायालयाने आरोपीला ठोठावली ही शिक्षा

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group