India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टोलनाक्यावरील झोल मिटला! फास्टटॅगमुळे पथकर संकलन तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढले

India Darpan by India Darpan
January 25, 2023
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील काही वर्षात फास्टैग द्वारे केलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. वर्ष 2022 मध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांसह इतर टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे झालेल्या एकूण टोल संकलनात 2021 च्या 34,778 कोटी रुपये संकलनाच्या तुलनेत अंदाजे 46 टक्क्यांनी वाढ होऊन ते 50,855 कोटी रुपये झाले आहे.

डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे सरासरी दैनिक पथकर संकलन 134.44 कोटी रुपये झाले आणि एका दिवसातील सर्वाधिक संकलन 24 डिसेंबर 2022 रोजी 144.19 कोटी रुपये झाले. याचप्रमाणे वर्ष 2022 मध्ये फास्टैग व्यवहारांमध्ये वर्ष 2021च्या तुलनेत 48%नी वाढ दिसून आली. वर्ष 2021 आणि वर्ष 2022 मध्ये अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी फास्टैग व्यवहार झाले.
आजमितीला एकूण 6.4 कोटी फास्टैग वितरीत करण्यात आले आहेत तर फास्टैग उपलब्ध असलेल्या टोलनाक्यांच्या संख्येतही वाढ झाली असून ती 2022 मध्ये 1,181 (323 राज्य महामार्ग टोलनाके ) इतकी झाली आहे मागील वर्ष 2021 मध्ये ही संख्या 922 होती.

यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, फास्टैग कार्यक्रमांतर्गत आगमनानंतरच्या ऑन-बोर्डिंग राज्य टोलनाक्यांसाठी 29 वेगवेगळ्या राज्यांच्या संस्था/अधिकारिणी सह सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

Highway Fast Tag Toll Collection Transparency


Previous Post

पालकमंत्री दादाजी भुसेंच्या हस्ते होणार प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण; समारंभात हे घेऊन जाता येणार नाही

Next Post

चक्क यामध्ये लपवले होते तब्बल ३६ किलो सोने; अधिकारीही चक्रावले, असा उधळला तस्करीचा कट

Next Post

चक्क यामध्ये लपवले होते तब्बल ३६ किलो सोने; अधिकारीही चक्रावले, असा उधळला तस्करीचा कट

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group