India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रवाशाने चप्पलमध्ये लपवले तब्बल एवढे सोने; अधिकारीही चक्रावले (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विमान प्रवासी तस्करीसाठी कधी काय प्रयोग करतील याचा नेम नाही. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकॉकहून बेंगळुरूला पोहोचलेल्या एका प्रवाशाने चक्क त्याच्या चप्पलमध्ये सोने लपवले होते. मात्र, तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय शिताफीने त्याला पकडले आहे.

सीमा शुल्क विभाग देशातील विमानतळांवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि सोने जप्त करत असते. याच अधिकाऱ्यांच्या गळाला एक प्रवासी लागला आहे. इंडिगोच्या विमानाने एक प्रवासी बँकॉकहून बंगळुरूला पोहोचला. या प्रवाशाकडे सोने असल्याची शंका अधिकारी व कर्मचाऱ्यांना आली. त्यामुळे या प्रवाशाची कसून चौकशी करण्यात आली. पण, फायदा झाला नाही. अखेर या प्रवाशाची चपले अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. सुरक्षा मशिनमध्ये या चपला स्कॅन केले असता मशिनने रेड सिग्नल दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने या चपलेचा छडा लावला. या प्रवाशाने चप्पलमध्ये ६९.४० लाख रुपये किमतीचे १.२ किलो सोने लपवून ठेवले होते. ते पाहून अधिकारी व कर्मचारीही अवाक झाले. हे सोने जप्त करण्यात आले असून प्रवाशाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

#WATCH | Gold weighing 1.2 kg worth Rs 69.40 lakh seized from a slipper of a passenger who arrived from Bangkok in Bengaluru by IndiGo flight: Customs pic.twitter.com/4dBwb5Dhpv

— ANI (@ANI) March 15, 2023

Gold Seized on Airport from Passenger Slipper


Previous Post

येवल्यात ६० फुट विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला असे मिळाले जीवदान (बघा व्हिडिओ)

Next Post

#indiadarpanlive #Live #News #Updates

Next Post

#indiadarpanlive #Live #News #Updates

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group