पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुळशी ते सातारा मार्गावर शहरात असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. हा उड्डाणपुल येत्या १ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उड्डाणपुलामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
पुणे- मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल गेल्या वर्षी १ व २ ऑक्टोबर दरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात आला. चांदणी चौकात होणारी वाहतुकीचा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौक येथे एकात्मिक संरचना पूल प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. यासाठीच या ठिकाणी अस्तित्वातील जूना पूल पाडण्यात आला. आता हा महामार्ग सहापदरी होत आहे. याठिकाणचा उड्डाणपूल हा अतिशय रंगबीरंगी केला जात आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सध्या रंगकाम सुरू आहे. त्याचा व्हिडिओ केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शेअर केला आहे. बघा, हा व्हिडिओ
https://twitter.com/nitin_gadkari/status/1647843575433154561?s=20
glimpse of Chandani Chowk Flyover beautification project Pune Video