इंडिया दर्पण विशेष लेख
बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा २०२३
डिंग लिरेन- नेपोम्नियाची लढत रंगतदार अवस्थेत
कझाकस्तान येथील अस्ताना येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वविजेते पदाची रशियाचा ग्रॅंडमास्टर आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आयन नेपिम्नियाची आणि चीन चा ग्रॅन्डमास्टर आणि जागतिक रॅंकिंग मध्ये तिसऱ्या क्रमांकावरील डिंग लिरेन यांच्यातील १४ डावांची लढत सहा डावां नंतर ३-३ अशा अतिशय रंगतदार स्थितीत आहे

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
पहिल्या सहा डावात दोन्ही खेळाडूनी दोन दोन डाव जिंकले तर दोन डाव ( पहिला आणि तिसरा ) अनिर्णित राहिले ! पहिल्या सहा डावातील चार डाव निकाली होणे ही घटना बुद्धिबळ विश्वचषक इतिहासात फक्त या पुर्वी फक्त दोनदा – १९७३ साली बॉबी फिशर आणि बोरिस स्पास्की यांच्या लढतीत आणि १९८१ साली अनातोली कारपॉव विरूध्द कास्पारोव्ह लढतीत – घडली आहे !
सहा डावात एकदम चार डाव निकाली कसे लागले असा प्रश्न लिरेन ला त्याने सहावा डाव जिंकल्यावर पत्रकारांनी विचारल्यावर लिरेन गमतीने पण नकळत वस्तुस्थिती बोलला , ” आम्ही दोघेही कार्लसन इतके बुद्धिमत्ता असलेले खेळाडू नाही ,” .
थोडक्यात हरणारा सामना कसा जिंकायचा किंवा अनिर्णित ठेवायचा हे कौशल्य फक्त कार्लसनमध्येच आहे हे सांगून त्याने एक प्रकारे कार्लसनचे महानपण मान्य केले !
चौथा डाव नेपो अनपेक्षित रित्या हरल्यानंतर पाचवा डाव ४८ चालीत आणि पांढऱ्या मोहरा घेउन तो जिंकला आणि ३-२ अशी आघाडी घेतली खरी पण ती २४ तासही टिकली नाही कारण सहावा डाव लिरेन ने पांढऱ्या मोहऱ्यासह ४४ चालीतच जिंकून ३-३ अशी बरोबरी केली आणि या रोमहर्षक लढतीची चुरस वाढविली !
दोन्ही खेळाडूच्या मते ते उत्तम खेळत आहेत पण दबावामुळे चुकाही भरपूर करीत आहेत तर जगातील माजी बुद्धिबळ खेळाडू आणि समालोचन करणारे डॅनिल डुबोव (रशियन ग्रॅंडमास्टर) आणि अमेरिकन महिला विश्वचषक विजेती एरिना कृश हे अतिशय खुश आहेत कारण त्यांना विश्लेषण करण्यासाठी उत्तम खाद्य मिळत आहे तर जगातील बुद्धिबळ रसिक देखील या तोडीस तोड लढतीचा आनंद लुटत आहेत !
दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
deepakodhekar@gmail.com
World chess championship 2023 Ian Nepomniachtchi Ding Liren