इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमामध्ये अखंड बुडालेले प्रेमिक एकमेकासाठी काहीही करायला तयार असतात. विशेषतः प्रियकर प्रेमिकेसाठी चांद तारे तोडून आणण्याच्या गोष्टी करतो. मी तुझ्यासाठी वाट्टेल ते करेल, आपल्या प्रेमाच्या आड कोणी येत असेल तर सर्व दुनियेला जाळून टाकेल, असे देखील प्रियकर मानतो. कारण बॉलिवूड तथा हिंदी चित्रपटात देखील ‘ मै दुनिया को, मिटा दूंगा तेरे लिये, ‘असे गाणे असते. त्याचा प्रभाव प्रियकरावर पडतो. एका प्रियकराने देखील आपल्या प्रेमिकेसाठी रागाच्या भरात चक्क शाळेलाच आग लावली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच एका बॉयफ्रेंडने टोकाचं पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंड इतका संतापला की, त्याने थेट शाळेलाच आग लावल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
एका रिपोर्टनुसार, मेनोयुफिया प्रांतात ही घटना घडली. एका 21 वर्षांच्या तरुणाने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली म्हणून शाळाच पेटवली आहे. या दोघांचं लग्न ठरलं असून त्यांचा साखरपुडा झाला आहे. होणारी पत्नी शाळेतील परीक्षेत नापास झाली तर लग्न पुढे ढकललं जाईल. तिला पुन्हा वर्षभर अभ्यास करावा लागेल, या विचारातून तरुणाने गर्लफ्रेंडची शाळाच पेटवून दिली आहे. आगीमध्ये शाळेतील कंट्रोल रुम जळून खाक झाली आहे.
यात शाळेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून गेली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग नियंत्रणात आली. शाळेला आग लावल्यानंतर तरुण पळून गेला आणि स्वत:च्या गावात जाऊन लपला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलीस चौकशीत तरुणानं गुन्ह्याची कबुली दिली. त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सध्या तरुण पोलीस कोठडीत आहे.
Girl Friend Boy Friend Love Affair School Fire Burn