पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगप्रसिद्ध भारतीय मसाल्यांपैकी काळी मिरी सर्वांना माहिती असून भारतीय आहारात तिचा आवर्जून वापर केला जातो. असे कोणतेही घर आढळणार नाही ज्यांच्या आहारात गरजेनुसर काळी मिरी वापरत नाही. अनेक स्वादिष्ट भाज्या आणि पदार्थ बनवताना जर त्यात काळी मिरी टाकली नाही तर त्या पदार्थाची चव कुठे ना कुठे कमी राहते.
आहारशास्त्रानुसार असेही सांगितले जाते की, काळी मिरी ही फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. अनेक वैद्यकीय संशोधनातून सुद्धा हि गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात काळी मिरीचा वापर करायलाच हवा. आज आपण या लेखातून काळी मिरीमुळे आपल्या शरीरला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त उपाय ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो सेही सांगितले गेले आहे. म्हणून ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी मधासोबत काळ्या मिरीच्या पावडरचे सेवन करावे. याचा परिणाम लवकरच दिसून तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून अवश्य आराम मिळेल.
काळी मिरी अतिशय फायदेशीर असते. याचं सेवन करण्यासाठी विविध प्रकार आहेत. आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी काळी मिरी तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवणारी काळी मिरी अतिशय उपयुक्त आहे. भारतीय मसाल्यांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. काळी मिरी हा औषधांचा खजिना आहे. परदेशातही काळी मिरीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते.
काळी मिरी सांधेदुखीतपासूनही आराम देते. काळी मिरी वात दोष दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. काळी मिरी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करायची असेल तर रोज काळी मिरीचं सेवन करा. केसगळती, कोंडा आणि बुरशी दूर करण्यासाठी काळी मिरी उपयुक्त आहे.
काळी मिरी कर्करोगाशी लढण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरीचं चघळून किंवा चोखून सेवन करा. यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होईल. काळी मिरीचं सेवन मासिक पाळी नियमित करण्यासही फायदेशीर आहे. याशिवाय मधुमेह टाळण्यास देखील याचा फायदा होतो. काळी मिरीच्या सेवनाने श्वसनासंबंधित समस्याही दूर होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Health Tips Black Papper Nutrition Food