घोटी – इगतपुरी तालुक्यात सरपंच परिषदची मुहूर्त वेढ रोवणाऱ्या प्रमुख तथा माणिकखांब गावचे माजी युवा सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित नाशिक येथे प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती लक्षात घेता चव्हाण यांचा प्रवेश झाल्याची चर्चा आहे. तालुक्याचे माजी आमदार शिवराम झोले व माजी जिप सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला आहे. दरम्यान माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षात माणिकखांब गावाच्या विकासासाठी खासदार, आमदार व चौदा वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न केला व गावात विकासात्मक कामे देखील मोठ्या प्रमणात केला. भविष्यात ही गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कामे करण्याचा मानस त्यानी व्यक्त केला आहे.
दरम्यान यापूर्वी माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण हे मनसे मध्ये होते मात्र त्यांनी आज मनसेला सोडचिठी देत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला एक युवा नेतृत्व मिळाले असून त्यांच्या कामाची दखल घेत स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यांच्या प्रवेशाचे स्वागत माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, शिवराम झोले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, माजी सभापती विष्णू चव्हाण, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, नारायण वळकंदे, वसीम सय्यद, अनिल पढेर, मदन कडू आदींनी केले आहे.