मुंबई – काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक व्हिडिओ शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत म्हटले होते की, मला लिपस्टिक आवडत नाही. मी लिपस्टिकचे समर्थन करीत नाही. तसेच, लिपस्टिकवर बंदी घालायला हवी. बॅन लिपस्टिक असे तेजस्विनीने व्हिडिओत म्हटले. त्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. खासकरुन मनोरंजन क्षेत्रातूनही मतमतांतरे दिसून येत आहेत. आता अभिनेत्री प्राजक्ता माळीही पुढे आली आहे. आता प्राजक्तानेही एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यात प्राजक्ता म्हणते की, मी सुद्धा लिपस्टिक वापरत नाही. मी त्याचे समर्थन करीत नाही. असे म्हणत ओठांना लावलेली लिपस्टिक पुसत प्राजक्ताने लिपस्टिक विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता लिपस्टिक विरोधाची मोहिमच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. बघा, प्राजक्ताचा हा व्हिडिओ