India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जायफळापासून बनवला वेदनाशमक जेल… असे करणार काम… फार्मसी प्राध्यापकांचे यश… पेटंटही मिळवले…

India Darpan by India Darpan
December 1, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एससमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश उशीर व प्राध्यापक डॉ सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. पुढील २० वर्षांपर्यंत या पेटंटचे ‘एसएमबीटी’कडे अधिकार असणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभ्यासपूर्ण केलेल्या संशोधनामुळे मिळालेल्या या विशिष्ट पेटंटनंतर डॉ उशीर यांच्यासह एसएमबीटीमधील सहकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे….

लहानपणी आजी काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी वेदनाशामक असून शरीराची दुखणे कमी करण्यास रामबाण उपाय ठरू शकतात असे निदर्शनास आले. या संशोधनाबाबत अधिक माहिती देत डॉ उशीर म्हणाले की, जायफळ वेदनाशामक औषध असून इतर वेदनाशामक औषधांनादेखील ते बुस्टर म्हणून काम करू शकते आहे. या औषधाच्या अनेक चाचण्या झाल्या यासोबतच गुणवत्तेचीदेखील पडताळणी करण्यात आली.

या प्रकारातील संशोधन यापूर्वी कुठेही झालेले नाही असेही पटवून देण्यात आले. या औषधाच्या उत्पादनासाठीची यंत्रणा कशी काम करणार? तसेच अधिक प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास काय करावे? पेटंट नोंदणी झाल्यानंतर औषधाला सर्वसामान्य रुग्णांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवावयाचे याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्वांच्या कार्याबद्दल एसएमबीटी व्यवस्थापनाकडून सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले.

जेल असा काम करणार…
हर्बल प्रकारात हे प्रोडक्ट मोडणार आहे. अनेक नागरिकांना वयोमानानुसार, गुडघेदुखीचा त्रास असतो, शरीरावर सूज येते, सांधेदुखी सारख्या असह्य आजारांचा त्रास असतो. बाजारातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मलममुळे फरक न पडलेल्या रुग्णांना या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. साईड इफेक्टस टाळण्यासाठी आता बहुतांश नागरिक आयुर्वेदाकडे वळले आहेत. त्यामुळे हा जेल रामबाण उपाय म्हणून काम करणार यात शंका नाही.

आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग
आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती परिषदांमध्ये एसएमबीटी फार्मसीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांत प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली आहे. इतर देशातील अनेक तज्ञ यानिमित्ताने जोडले गेले आहेत.

महाविद्यालयात अनेक नवनवीन संशोधनांवर काम सुरु आहे. यातील पहिल्या प्रयत्नाला यश आले आहे. येणाऱ्या काळात आणखी काही पेटंट आपणास मिळतील. या जेलचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होणार असून इतर वेदनाशामक जेलच्या तुलनेत या जेलची किंमत कमी राहण्याची शक्यता आहे.
– डॉ. योगेश उशीर, प्राचार्य, एससमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी

Gel Made from Nutmeg Pharmacy Professor Research
SMBT Institute Nashik Jaifal Pain Killer


Previous Post

गुड न्यूज….जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन होणार नव्या मालकाच्या नावावर

Next Post

वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली

Next Post
प्रातिनिधिक फोटो

वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group