India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अदानी रिटर्न्स! अवघ्या काही तासात कमावले एवढे कोटी; संपत्तीत साडेपाच अब्ज डॉलर्सने वाढ

India Darpan by India Darpan
February 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाची संपत्ती फक्त पाच दिवसांत निम्म्यावर आली होती. साऱ्या देशाला धक्का बसला. गुंतवणुकदार तर टेंशनमध्येच आले. सर्वसामान्यांचा तसा थेट संबंध नसतानाही अदानींच्या संपत्तीविषयी कुतुहल निर्माण झाले. पण या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय गुंतलेले असताना गेल्या तीन दिवसांत अदानींच्या संपत्तीत साडेपाच अब्ज डॉलरची भरही पडली आहे.

बडे लोग बडी बाते असे आपण फार सहज म्हणतो. पण तेच वास्तव आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती २१ व्या स्थानावर आल्याने त्या व्यक्तीच्या स्टेटसला नक्कीच धक्का बसतो. पण तरीही ती व्यक्ती गरीब होत नाही. याचीच प्रचिती देणारी घटना गेल्या तीन दिवसांत घडली आहे. अदानींचे पाय किती खोलात गेले आहेत, याची चर्चा माध्यमांवर सुरू असताना त्याच काळात अदानींनी रग्गड पैसाही कमावून घेतला.

अदानी उद्योग समूहाच्या दहापैकी सहा कंपन्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तोट्यात होत्या. पण आज अदानींच्या तीन कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. अदानींच्या या कमबॅकची आता जगभर चर्चा होत आहे. अदानी इंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये १३ टक्के वाढीसह २ हजार ३६ रुपयांची पातळी ओलांडली गेली आहे. अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले आहेत. तर अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये साडेसात टक्क्यांनी वाढ झालेली आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि टोटल गॅस वगळता सर्व कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

श्रीमंतांच्या यादीत १७व्या स्थानावर
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी जगातील सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आणि एफपीओ मागे घेणे या दोन घटनांमुळे त्यांची संपत्ती ५३ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे ते थेट २१ व्या स्थानावर घसरले. पण गेल्या तीन दिवसांत अदानींनी चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा वर झेप घेतली आहे. आता ते १७व्या स्थानावर आहेत.

Gautam Adani Wealth Hike Within Few Hours Share Market


Previous Post

‘हे जनमत नसलेले सरकार, म्हणूनच मंत्र्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या राहतात’, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Next Post

थेट कोर्टातच घुसला बिबट्या…. उडाली एकच खळबळ… अनेक जण जखमी… शर्थीच्या प्रयत्नांनी अखेर जेरबंद

Next Post

थेट कोर्टातच घुसला बिबट्या.... उडाली एकच खळबळ... अनेक जण जखमी... शर्थीच्या प्रयत्नांनी अखेर जेरबंद

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group