बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गौरींच्या आगमनाने घरोघरी चैतन्याचे वातावरण

by India Darpan
सप्टेंबर 4, 2022 | 1:24 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220904 WA0018 e1662278037964

 

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री गणराया पाठोपाठ घराघरात आज जेष्ठा, कनिष्ठा गौरींच आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे. सोनपावलांनी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घरोघर कामांची लगबग सुरु होती. घरातील पुरुष मंडळींनी सजावटीसाठी बरीच मेहनत घेतली. गणराया पाठोपाठ गौरींचं आगमन झाल्याने घरोघर चैतन्याचं वातावरण पसरले होते. त्र्यंबकेश्वर मध्ये तिनशे पेक्षा अधिक घरांमध्ये गौरींचे आगमन झाले आहे. प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्कृष्ठ सजावट करण्यात आलेली होती. माहेरी आलेल्या गौरींच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरु आहे. घराघरात खमंग वास दरवळत आहे. घरांसमोर विविधरंगी रांगोळ्या व गौरींचे सोनपावलं लक्ष वेधुन घेत आहे. गौरी गणपतीच्या आगमनाने घरातील बच्चे कंपनीमध्ये उत्साह संचारला होता.

पांडव नगरी, नाशिक मधील नंदकुमार धारणे यांच्या त्र्यंबकराज निवासस्थानी गौरींचं पारंपारीक रित्या मोठ्या थाटात आगमन झाले. वसुधा, निलीमा, राधिका, आकांक्षा आदी सुवाशिनींनी मोठ्या भक्तीभावाने गौरींचे स्वागत व स्थापना केली. अभिजित, आशिष, आदित्य यांनी उत्कृष्ठ सजावट केली. परी, काव्या, आद्य, श्रावी, या बालगोपाळांनी सर्व कामांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. त्र्यंबकेश्वर येथील वेदमुर्ती महेंद्र तथा बाळासाहेब धारणे यांच्या नाथकृपा निवासस्थानी गौरींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. स्वाती, मयुरी, निखिल, हर्षदा तसेच हिरण्या यांनी मोठ्या उत्साहात गौरीचे स्वागत केले.

नाशिक इंदिरानगर परिसरात सत्यसंगम सोसायटीमध्ये सुपर प्रिटींग प्रेसचे संचालक उज्वला विनायक रत्नपारखी यांच्या निवासस्थानी गौरींची उत्कृष्ठ सजावट करण्यात आली आहे. नाशिक, खुटवडनगर, २०२, श्रीव्यंकटेश प्राईड मध्ये वैभव व विनोद देशपांडे यांच्या निवासस्थानी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तिर्थाचा देखावा तयार करुन गौरींची सजावट करण्यात आली आहे. याकामी दिपाली, उर्मिला, आर्या, वरद, श्रावणी आदिंनी परिश्रम घेतले. काल गौरींचं आगमन झाल्यावर आज पुजन तर उद्या म्हणजे सोमवारी मुळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये यंदाही “देव द्या, देवपण घ्या” उपक्रम; असा घेता येईल लाभ

Next Post

दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यास ठाकरे घेणार हा निर्णय

India Darpan

Next Post
Uddhav Thackeray1 1

दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यास ठाकरे घेणार हा निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011