नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगारकी चतुर्थी निमित्त श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट आणि नवरंग सखी मंडळ यांच्या वतीने अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनाचे पठण करण्यात आले. नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू शेठ यांनी मोलाचे सहकार्य केले. नवरंग सखी मंडळच्या अध्यक्षा सरोज दशपुते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला. मंडळाच्या उपाध्यक्षा वैशाली थोरात तसेच ज्योती खांडेकर, मंगला वडनेरे, वैशाली नागरे, रोहिणी मांदळे, अनिता बच्छाव यांचेही सहकार्य लाभले. पठणासाठी मेरी, म्हसरुळ, इंदिरा नगर, विनय नगर, पंचवटी, सावरकर नगर येथील महिलांनी सहभाग घेतला. जवळजवळ १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.