India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक सिटी बसः हे नवे मार्ग सुरू तर या मार्गांवर ज्यादा फेऱ्या

India Darpan by India Darpan
September 13, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर बस वाहतूक सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांची वाढती संख्या व मागणी लक्षात घेता काही नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच, काही मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाश्यांनी या बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.. सिटीलिंकच्या वतीने प्रवासी संख्येचा विचार करता काही नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गांवरील बस फेर्‍यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे

१) मार्ग क्रमांक १३४ – नवीन सीबीएस ते कोणार्क नगर (संकलेचा सोसायटी) मार्गे निमाणी, अमृतधाम. – हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून सदर मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून २०.४५ पर्यन्त एकूण २० बस फेर्‍या देण्यात आल्या आहेत.
२) मार्ग क्रमांक १३५ – नवीन सीबीएस ते पार्क साईट मार्गे अमृतधाम, बी डी कामगार नगर – हा देखील नवीन मार्ग सुरू करण्यात आला असुन सदर मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून १९.५० पर्यन्त एकूण १८ फेर्‍या करण्यात येत आहे.

३) मार्ग क्रमांक १४७ – नवीन सीबीएस ते मोहाडी मार्गे म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, आंबे – या नवीन मार्गावर २ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून सकाळी ५.३० ते १८.३५ वाजेपर्यन्त एकूण १६ फेर्‍या या बसेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
४) मार्ग क्रमांक १२८ – निमाणी ते चुंचाळे गाव मार्गे त्रिमूर्ति चौक, कामटवाडे – सदर मार्गावर नवीन ४ बसेसची संख्या वाढविण्यात आली असून यामुळे आता सदर मार्गावर पूर्वीच्या ४ व नवीन ४ अश्या एकूण ८ बसेस कार्यरत असणार आहे. बसेस संख्या व पर्यायाने बस फेर्‍यांची संख्या वाढविण्यात आल्याने आता सदरील मार्गावर दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध असणार आहे.

५) मार्ग क्रमांक २०१ – नाशिक रोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, सिव्हिल, सातपुर, अशोक नगर – सदर मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली असून आता पूर्वीच्या अर्धा तासाऐवजी दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध करून
देण्यात आल्या आहेत.
६) मार्ग क्रमांक २०३ – नाशिक रोड ते सिम्बोईसीस कॉलेज मार्गे सी.बी.एस, पवन नगर, उत्तमनगर – सदर मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये देखील वाढ करण्यात आली असून या मार्गावर देखील पूर्वीच्या अर्धा तासा ऐवजी आता दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Nashik City Bus Citilinc New Routes and Extra Fares


Previous Post

१०० महिलांनी नवश्या गणपती मंदिरात केले अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनाचे पठण

Next Post

चोवीस तासांच्या आत देवळा पोलिसांनी घेतला अल्पवयीन मुलाचा शोध

Next Post

चोवीस तासांच्या आत देवळा पोलिसांनी घेतला अल्पवयीन मुलाचा शोध

ताज्या बातम्या

गणेशोत्सव विशेष… नाशिक श्रीगणेश… विघ्नहरण गणेश देवस्थान…

September 26, 2023

विद्यार्थ्यांनो, प्रवेश घेण्यापूर्वी इकडे लक्ष द्या… हे बघा, युजीसी काय म्हणतेय…

September 26, 2023

अष्टविनायक… ओझरचा श्री विघ्नेश्वर… अशी आहे पौराणिक कथा… बघा व्हिडिओ…

September 26, 2023

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… टिटवाळ्याचा महागणपती… अशी आहे त्याची महती…

September 26, 2023

ही आहे भारतातली पहिली महिला कोट्याधीश गायिका… तिची फी भल्याभल्यांना परवडायची नाही… जाणून घ्या तिच्याविषयी…

September 26, 2023

सावधान… शाही सोहळे, मौजमजा आणि मनसोक्त पैसे खर्च करताय… तुमच्यावर आहे यांची करडी नजर…

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group