इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात मोबाइल आणि संगणकामधील व्हिडिओ गेमने तरुणांना जणू काही वेडे केले आहे. या ऑनलाइन गेममुळे अनेक सायबर क्राईम देखील घडत आहेत. अशाच प्रकारची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. फ्री फायर हा ऑनलाइन गेम खेळत असताना दुर्ग येथील १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. या पीडित मुलीने आरोपीवर विश्वास ठेवून त्याला तिचा काही आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवला. त्याआधारे आरोपी तिच्याकडून लैंगिक शोषण करून पाच हजार रुपयांची मागणी करत होता.
पैसे न मिळाल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. या घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला राजस्थानमधून अटक केली. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुर्ग येथील रहिवासी एक महिला आपल्या १४ वर्षांच्या मुलीसह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली होती. राजस्थानमधील एक तरुण त्याच्या मुलीकडे लैंगिक शोषण करून पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली होती. पैसे न मिळाल्यास त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या टॉवर लोकेशनच्या आधारे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा आरोपी जयंत रोहिणी ( १९ ) हा गावातील कोटकस्ता रामसीन, जिल्हा जालोर ( राजस्थान ) येथील रहिवासी असून तो सतत आपली जागा बदलत होतो. मात्र मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला त्याच्या घरातूनच अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, फ्री फायर गेम खेळत असताना पीडितेशी त्याची ओळख झाली. तिथून दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. आरोपी त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत होता.